AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेटा तुमचा, वेदना तुमची आणि संपत्ती यांची, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांची टीका…

राहुल गांधी यांनी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात प्रयागराजला भाषण केले आहे. त्यांनी शिक्षण, रोजगार, पेपरफुटी आणि भरतीमधील विलंब यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

डेटा तुमचा, वेदना तुमची आणि  संपत्ती यांची, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांची टीका...
rahul gandhi
| Updated on: Aug 08, 2026 | 7:56 PM
Share

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवारी प्रयागराज येथे ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद केला. यावेळी तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले की तरुण आणि डाटाच्या जोरावर भारताची प्रगती झाली आहे. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पेपर लिक आणि भरती प्रक्रियेला उशीर सारख्या मुद्यांवर चर्चा केली.

राहुल गांधी यावेळी म्हणाले की एआयची चर्चा होते. मात्र, तुमच्या डेटा शिवाय एआयला कोणताही अर्थ नाही. डेटापासून एआय बनवता येते. परंतू एआयपासून डेटा तयार होत नाही. डेटा तुमचा, युथ पोटेंशियल तुमचा, परंतू सिस्टीमने तरुणांना चक्रव्युहात अडकवले आहे.

राहुल गांधी यावेळी म्हणाले की १००० पैकी केवळ १२ तरुणांना स्थायी नोकरी मिळते. तुमचा डेटा हिसकावून घेतला जातो आणि मोठ-मोठ्या कंपन्यांना तुमचा डेटा दिला जातो. तुम्हाला सांगितले जाते जेवढे रिल्स पाहायचे आहेत, जेवढे रिल्स बनवायचे आहेत. तेवढे बनवा, हा २१ व्या शतकाची नशा आहे.

हा कार्यक्रम काँग्रेसच्या वतीने तरुणांशी जोडलेल्या मुद्यांना उचलण्यासायी आयोजित केला जातो. काँग्रेस पक्ष सातत्याने बेरोजगारी, स्पर्धा परीक्षेतील अनियमितता आणि सरकारी नोकरी भरतीतील दीरंगाई यावर सरकारला प्रश्न विचारत आहे.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला प्रामुख्याने तीन गोष्टींवर चर्चा करायची आहे. वेदना तरुणांची, तरुणांचा डेटा आणि संपत्ती मात्र यांची.! राहुल पुढे म्हणाले की, तरुणांच्या वेदना आणि त्यांनी निर्माण केलेल्या डेटाबद्दल मी बोलत आहे. परंतु आजची खरी समस्या ही आहे की, जी संपत्ती तरुणांची असायला हवी, ती केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीए.

तरुणांची प्रशंसा करीत ते म्हणाले, “हे तुम्ही आहात. तुम्ही भारताची शक्ती, भारताचा अभिमान, भारताची ताकद आहात. मी गर्दीबद्दल बोलत नाहीए, मी प्रत्येक नागरिकांबद्दल, प्रत्येक तरुणाबद्दल बोलत आहे. तुमच्या सर्वांमध्ये बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि क्षमता आहे. जर या व्यवस्थेने तुम्हाला ब्रेक केले नाही, तर या देशाचे भविष्य तुमच्या ताकदीवरच उभारले जाईल.”

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष जारी

काँग्रेसने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करीत कार्यक्रमा संदर्भात म्हटले की काँग्रेस पक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करत राहील. पक्षाने म्हटले आहे की छात्रों की गुंज हा प्रयागराजमधून असा आवाज उठवण्याचे व्यासपीठ आहे. याची गुंज संपूर्ण देशात ऐकू येणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी