AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल अंबानी यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपेना, खंडाळा फार्महाऊस आणि मुंबईतील फ्लॅट जप्त, आतापर्यंत 19,000 कोटींची एकूण संपत्ती जप्त

ईडी उद्योजक अनिल अंबानी यांच्या मागे हात धुवून लागली असून मनी लाँड्रींग केसमध्ये त्यांची ३,०३४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात RCOM आणि R-Infra संबंधित संपत्ती आणि शेअरचा समावेश आहे. आता पर्यंत १९,३४४ कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

अनिल अंबानी यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपेना, खंडाळा फार्महाऊस आणि मुंबईतील फ्लॅट जप्त, आतापर्यंत 19,000 कोटींची एकूण संपत्ती जप्त
Anil Ambani
| Updated on: Apr 28, 2026 | 6:38 PM
Share

उद्योजक अनिल अंबानी ग्रुपच्या अडचणींचा ससेमिरा काही कमी व्हायचे नाव घेत नाहीए… सक्त वसुली संचालनालयाने ( ED ) मनी लॉड्रींग प्रकरणात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप ( RAAG ) ची ३,०३४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या ताजा कारवाईने आतापर्यंत समुहाच्या एकूण जप्त झालेल्या संपत्तीचा आकडा १९,००० कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे.

या संपत्तीवर ईडीची धाड

सक्त वसुली संचालनालयाच्या कारवाईच्या व्याप्तीत रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ( R-Infra ) संबंधित मौल्यवान संपत्ती आल्या आहेत. जप्तीत या संपत्तीचा समावेश आहे.

मुंबईस्थित आलीशान फ्लॅट आणि खंडाळाचा फार्महाऊस…

अहमदाबादच्या जवळ सानंद येथील जमीनीचा मोठा भाग

राइजई (RiseE) ट्रस्ट स्ट्रक्चर अंतर्गत ठेवलेले गेलेले रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचे 7.71 कोटी शेअर्स

ही संपूर्ण कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA), 2002 अंतर्गत कठोर तरतूदी अंतर्गत केली आहे

19,344 कोटी रुपयांपर्यंत जप्तीची व्याप्ती –

अनिल अंबानी समूहाच्या बँकांच्या सोबत धोका

बँकांच्या सोबत सुरु असलेल्या फसवणूक आणि फंडाची हेराफेरीचा (Diversion of Funds) गंभीर आरोप आहे. ED अनेक काळापासून या कंपन्यांच्या आर्थिक देवाण-घेवाणीची चौकशी करत होते. ताज्या घटनेत केलेल्या जप्तीमुले या प्रकरणात जप्त केलेली संपत्तीची किंमत १९,३४४ कोटी रुपयांहून जास्त झाली आहे.

का होत आहे चौकशी ?

तपास यंत्रणांचा आरोप आहे की अनिल अंबानी समुहाच्या कंपन्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा वापर त्या कामांसाठी केला ज्या कामांसाठी कर्ज काढले होते. त्या ऐवजी निधीला अशा ठिकाणी वळवले, जे मनी लाँड्रींगच्या श्रेणीत येते. सध्या ईडीने या संपत्तीला अस्थायी रुपाने ( Provisionally Attached ) जप्त करुन प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.

गुंतवणूकदारांची आणि कॉर्पोरेट जगताची नजर आता या गोष्टींवर टीकली ही कायदेशीर संकटात अकडलेल्या अनिल अंबानी हे आता या संकटातून बाहेर कसे येतात याकडे सर्वांची नजर लागली आहे.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!