Nitin Gadkari: फीत कापायची तेव्हा कापली जाईल, उद्घाटनाची अडचण, तर गडकरींनी त्यापूर्वीच जनतेसाठी खुला केला हायवे

उद्घटानावरुन अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर गडकरींनी थेट हायवे जनतेसाठी खुला करण्याचे निर्देशच देऊन टाकले. आता गुरुग्रामच्या दक्षिणेपर्यंत पोहण्यासाठी विना सिग्नल प्रवास जनतेला करता येणार आहे.

Nitin Gadkari: फीत कापायची तेव्हा कापली जाईल, उद्घाटनाची अडचण, तर गडकरींनी त्यापूर्वीच जनतेसाठी खुला केला हायवे
उद्घाटनाआधीच हायवे खुला
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 3:34 PM

नवी दिल्ली – नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांची काम करण्याची पद्धत निराळी आहे. ते बोलतातही स्पष्ट आणि त्यांच्या कामाचा आवाका आणि आवरही अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्घाटनाविनात (without inauguration)त्यांनी एक हायवे जनतेसाठी खुला करुन दिला आहे. साधारणपणे असे हायवे बांधल्यानंतर, संबंधित मंत्री किंवा मान्यवर मंडळी तिथे येतात, नारळ फोडतात, उद्घाटनाची फित कापतात, भाषणे देतात आणि नंतर हायवेवर गाड्या धावण्यास सुरुवात होते. मात्र २२ किलोमीटर लांब असलेला सहापदरी सोहाना हायवेच्या (Sohana Highway)उद्घटानावरुन अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर गडकरींनी थेट हायवे जनतेसाठी खुला करण्याचे निर्देशच देऊन टाकले. आता गुरुग्रामच्या दक्षिणेपर्यंत पोहण्यासाठी विना सिग्नल प्रवास जनतेला करता येणार आहे.

ट्रायल रनचे तांत्रिक कारण

जोपर्यंत रस्त्याचे औपचारिक उद्घाटन होणार नाही, तोपर्यंत या हायवेवरुन धावणाऱ्या गाड्यांना ट्रायल रनच्या नावाने संबोधण्यात येणार आहे. ही तांत्रिक पळवाट शोधून काढण्यात आली आहे. याची काळजी वाहनचालकांना करण्याची गरज नाही. वाहनचालक आता अवघ्या २० मिनिटांत सोहनात पोहचू शकणार आहेत. या रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी या हायवेचं आणि कामाच कौतुक केलं आहे. या रस्त्यावरु आता १०० किमी वेगाने आणि आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहत जाता येणे शक्य होणार असल्याचं एका वाहनचालकाने सांगितलं आहे.

सोमवारी होणार होते उद्घाटन

गडकरींच्या हस्ते सोमवारी या हायवेचं उद्घाटन होणार होतं. मात्र हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यामुळं आता हायवेही उद्घाटनानंतरच खुला होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र गडकरींनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सूचना दिल्या की, औपचारिक उद्घाटनाच्या तारखेची वाट न पाहता ट्रायलसाठी हा रस्ता खुला करावा. सोमवारी सकाळी गडकरींनी याबाबत ट्विट केल्यानंतर एनएचएआयने राजीव चौक ते बादशाहपुराचा ९ किमीचा रस्ता खुला केला आहे. त्याचा इतर भाग आधीच खुला करण्यात आला होता.

उद्घाटनाच्या नादात जनतेचे नुकसान नको

याबाबत एका वृत्तपत्राला नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात गडकरी म्हणाले- सोहना राष्ट्रीय हायवे हा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या ट्रायल रनसाठी तो खुला करण्यात आलाय. या रस्त्याचे औपचापिक उद्घाटन १९ जुलैला होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन होत नाही म्हणून जनतेला त्याच्या लाभापासून वंचित ठेवावे, असे आपल्याला वाटत नाही.