AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ukraine | भारतीय दूतावासाचं कामकाज पुन्हा किव्हमधून सुरु होणार, पुढील आठवड्यात सुरुवात, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय

रशिया - युक्रेनदरम्यान युद्ध संघर्ष वाढल्यानंतर युक्रेनमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाने मोठी कामगिरी केली होती. ऑपरेशन गंगा अंतर्गत 20,000 भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्यात आलं.

Ukraine | भारतीय दूतावासाचं कामकाज पुन्हा किव्हमधून सुरु होणार, पुढील आठवड्यात सुरुवात, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 11:34 AM
Share

किव्हः रशिया आणि युक्रेन (Rassuia- Ukraine) युद्ध शिगेला पोहोचलं तेव्हा किव्हमधून पोलंड येथे हलवण्यात आलेलं भारतीय दूतावास आता पुन्हा एकदा किव्हमध्ये परतणार आहे. पुढील आठवड्यात किव्हमधूनच  (Kyiv)भारतीय दूतावासातील (Indian Embassy) अधिकारी काम सुरु करतील. भारत सरकारतर्फे शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. 13 मार्च रोजी रशिय आणि युक्रेनमधील युद्ध टिपेला पोहोचलं होतं. युक्रेनच्या पश्चिम भागात रशियाकडून सातत्याने हल्ले होत होते. त्यामुळे भारतीय दूतावास पोलंडमधील वॉर्सा येथे हलवण्यात आले होते. आता रशियाचे हल्ले युक्रेनच्या पूर्व भागावर होत असल्याने पुन्हा एकदा किव्ह येथील दुतावास सुरु करण्याची ही योग्य वेळ असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कळवण्यात आलं आहे. अनेक पाश्चिमात्य देशदेखील युक्रेनशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा एकदा किव्हमधून राजनैतिक प्रक्रिया सुरु करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानेदेखील आपल्या दुतावासाचं कामकाज पुन्हा एकदा किव्हमधून सुरु करण्याचं ठरवल्याचं सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यात जप्मनी आणि कॅनडानेही आपलं दूतावास पुन्हा सुरु केलं. दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही किव्हला भेट दिली असून अद्याप त्यांनी अधिकृतरित्या दूतावासाचं कामकाज सुरु केलेलं नाही.

‘ऑपरेशन गंगा’नंतर दूतावास हलवलं होतं..

रशिया – युक्रेनदरम्यान युद्ध संघर्ष वाढल्यानंतर युक्रेनमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाने मोठी कामगिरी केली होती. ऑपरेशन गंगा अंतर्गत 20,000 भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्यात आलं. 26 फेब्रुवारी रोजी सुरु झालेलं हे मिशन यशस्वी झाल्यानंतर 13 मार्च रोजी युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरत्या स्वरुपात पोलंडमधील वॉर्सो येथे हलवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा किव्ह येथून काम करण्याची तयारी भारतीय दूतावास करत असून पुढील आठवड्यात 17 मे पासून हे कार्यालय सुरु होईल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

KNMU युनिव्हर्सिटीचे ऑनलाइन शिक्षण बंद

दरम्यान, युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतानाच मायदेशी परतावं लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. युक्रेनमधील एक महत्त्वाची युनिव्हर्सिटी असलेल्या खारकीव्ह नॅशल मेडिकल युनिव्हर्सिटी (KNMU) ने ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे मोठे दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाले असून युक्रेन सरकारकडून विद्यापीठाला मिळणारे वेतन बंद झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं काही वृत्तांमधून सांगण्यात आलं आहे. KNMU विद्यापीठाने विद्यार्थ्यांना यासंदर्भातला ई मेल पाठवला असून मे अखेरीस विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून त्या युक्रेन सरकारच्या शैक्षणिक अॅपवर घेतल्या जातील, असं कळवलं आहे. KNMU विद्यापीठाअंतर्गत 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी दोन हजार विद्यार्थी भारतीय आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.