मोठी बातमी! जगात आता आणखी एका नव्या युद्धाची सुरुवात, दोन बलाढ्य देश मैदानात, थेट भीषण एअर स्ट्राईक, जगात मोठी खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये तर युद्ध सुरूच आहे, या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता दोन नवे देश मैदानात उतरले आहे, यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! जगात आता आणखी एका नव्या युद्धाची सुरुवात, दोन बलाढ्य देश मैदानात, थेट भीषण एअर स्ट्राईक, जगात मोठी खळबळ
Saudi Arabia attack on Iraq
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 7:14 PM

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे जागतिक मार्केट अस्थिर बनलं असून, कच्च्या तेलाच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना आता मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये तर युद्ध सुरूच आहे, परंतु आता आणखी दोन आखाती देशांमध्ये युद्धाला तोडं फुटलं आहे. सौदी अरेबियाने आता युद्धात उडी घेतली असून, मंगळवारी सौदी अरेबियाने इराकवर एअर स्ट्राईक केला आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाकडून इराकच्या काही ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे, याबाबत अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या एअर स्ट्राईकबद्दल माहिती देणारी पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमेरिकन सेंट्रल कमांडने म्हटलं आहे की, सौदी अरेबियाच्या सैन्याने 28 जुलै रोजी इराकला पाठिंबा देणाऱ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. या दहशतवाद्यांना इराणच्या ‘रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'(IRGC) ने अमेरिकन सैन्य आणि सौदी अरेबियाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा आदेश दिला होता.

आयआरजीसीच्या इशाऱ्यानुसार गेल्या 72 तासांमध्ये तब्बल 30 पेक्षा जास्त ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबिया आणि अमेरिकेकडून इराकवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. युद्धात इराणला मदत करणाऱ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर आम्ही एअर स्ट्राईक केला आहे. सौदीकडून पूर्व इराकमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे, दहशतवाद्यांच्या शस्त्र भंडाराला या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून लक्ष्य बनवण्यात आलं आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात देखील या दहशतवाद्यांनी तब्बल 600 वेळा अमेरिकन सैन्यांवर हल्लाचा प्रयत्न केला होता, असा दावा देखील अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केला आहे. दरम्यान आता या हल्ल्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे, इराककडून देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर मिळू शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us