चंद्रयान-3 च्या यशात केवळ ISRO चे सायन्टीस्ट नाहीत तर डोसा आणि फिल्टर कॉफीचाही हातभार !

इस्रोच्या शास्रज्ञांना त्यांच्या जागतिक सहकाऱ्यांच्या तुलनेत पाचपट कमी पगार मिळतो. परंतू त्यांची गुणवत्ता त्यांच्यापेक्षा सरस आहे.

चंद्रयान-3 च्या यशात केवळ ISRO चे सायन्टीस्ट नाहीत तर डोसा आणि फिल्टर कॉफीचाही हातभार !
isro chandrayaan 3
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 01, 2023 | 10:45 PM

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहिमेच्या ऐतिहासिक यशात कौतूक आणि शाबासकी यांच्यात दबलेली एक आतील गोष्टही जबाबदार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ( isro ) आतल्या गोटातून या यशाचं एक वेगळच गुपित बाहेर आले आहे. हे गुपित चंद्रयान-3 चे यश आणि संध्याकाळी पाच वाजता मिळणाऱ्या मसाला डोसा आणि फिल्टर कॉफीशी जोडलेलं आहे. तर काही आहे साधारण वाटणाऱ्या या पदार्थांचं आणि चंद्रयान-3 या मोहिमेचं यश पाहूया…

चंद्रयान-3 जेव्हा एका अशक्य वाटणारी आणि अवघड मोहिमेची पूर्व तयारी करीत होता. तेव्हा इस्रोच्या जवळ आपल्या कर्मचाऱ्यांना काही फार मोठे देण्यासारखं नव्हतं. पत्रकार बरखा दत्त यांनी ‘दि वॉशिंगटन पोस्ट’ साठी घेतलेल्या मुलाखतीतून ही बाब उघड झाली आहे. यावेळी एका गोष्टीने टीमला उत्तेजना मिळाली. या मोहीमेतील एक वैज्ञानिक वेंकटेश्वर शर्मा यांनी सांगितले की आम्ही दर सायंकाळी पाच वाजता कर्मचाऱ्यांना मोफत मसाला डोसा आणि फिल्टर कॉफीचा नाश्ता द्यायला सुरुवात केली होती.

पाचपट कमी पगार मिळतो

शर्मा यांनी सांगितले की यातून कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली आणि सर्वांनी स्वयंप्रेरणे अतिरिक्त तास काम करायला सुरुवात केली. शर्मा यांना स्वत:लाही त्यांचे प्रेम इस्रोत सापडलं. त्यांनी प्रोजेक्टच्या मुख्य टीममधील महिला शास्रज्ञाशी विवाह केला. इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी म्हटले की आम्ही केवळ आवश्यक गोष्टींवर खर्च करतो. आमचे वैज्ञानिक भारत किंवा विदेशातील कोणत्याही कंपनीतील वैज्ञानिकांच्या तुलनेच अधिक प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या जागतिक सहकाऱ्यांच्या तुलनेत पाचपट कमी पगार मिळतो. भारताने गेल्या 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या रहस्यमयी दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग करुन इतिहास घडविला आहे. हे यश मिळविणारा तो जगातला पहिला तर चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करणार चौथा देश ठरला आहे.