ATM मधून निघाली खेळण्यातली नोट, लिहले होते Full Of Fun

| Updated on: Oct 27, 2022 | 9:45 AM

एका एटीएममधून चक्क खेळण्यातील नोट निघाल्याने खळबळ उडाली आहे. कुठे घडला हा प्रकार जाणून घेऊया.

ATM मधून निघाली खेळण्यातली नोट, लिहले होते Full Of Fun
खेळण्यातील नोट
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली, लहानपणी आपण चॉकलेट्स किंवा बिस्कीट घ्यायचो घ्यायचो तेव्हा त्याच्यासोबत खेळण्यातल्या नोटा (Toy Note) मिळायच्या. लहानपणी या नोटांचे विशेष आकर्षण असायचे. ही नोट केवळ मनोरंजनासाठी असल्याचे या नोटांवर स्पष्ट लिहिले असते. तर रिझर्व्ह बँकेऐवजी चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले असते. अशा नोटांचा ( वास्तविक नोटांशी काहीही अर्थ नसतो. कल्पना करा, एटीएममधून अशा नोटा मिळाल्या तर काय होईल? उत्तर प्रदेशातील अमेठीच्या एटीएममधून चुरन नोट बाहेर आली आहे, ज्याबद्दल ग्राहक आश्चर्यचकित झाले आहेत. या नोट्सवर ‘Full Of Fun’ असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक प्रकारावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

कधी घडली ही घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण अमेठी शहरातील इंडिया वन एटीएमचे आहे, जिथे सोमवारी संध्याकाळी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी लोकांची रंग लागलेली होती. यावेळी एका व्यक्तीला एटीएममधून मूळ नोटेसह 200 रुपयांची बनावट नोट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पाहून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. काही वेळातच तिथे गर्दी जमली. लोकांनी याची माहिती अमेठी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणी लोकांची चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडिओ @aditytiwarilive ने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. बातमी पब्लिश होईपर्यंत  या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले – खूप सुंदर व्हिडिओ. दुसर्‍या यूजरने कमेंट करताना लिहिले आहे. यापेक्षा चांगला व्हिडिओ कोणता असू शकतो.