VIDEO: अनपेक्षित आनंदोत्सव, ट्रेन वेळेच्या आधी 20 मिनिटे रतलाम स्टेशनला पोहोचली मग काय?..आनंदात प्रवाशांनी चक्क केला गरबा.

| Updated on: May 27, 2022 | 4:40 PM

ही ट्रेन रतलाम स्टेशनवर बिफोर टाईम 20 मिनिटे आली. या स्टेशनवर ट्रेन 10 मिनिटे थांबते. पण गाडी 20 मिनिटे आधी आल्याने स्टेशनवर ट्रेनचा मुक्काम 30 मिनिटांचा होता. त्यामुळे प्रवाशांकडे वेळच वेळ होता. यातच ट्रेनमधून प्रवास करणारा एक ग्रुप प्लॅटफॉर्मवर आला आणि त्यांनी हा आनंद नाचून साजरा केला

VIDEO: अनपेक्षित आनंदोत्सव, ट्रेन वेळेच्या आधी 20 मिनिटे रतलाम स्टेशनला पोहोचली मग काय?..आनंदात प्रवाशांनी चक्क केला गरबा.
Ratlam railway station dance
Image Credit source: social media
Follow us on

रतलाम – रतलाम रेल्वे स्टेशनवर (Ratlam Railway Station) प्रवाशांचा आनंदोत्सवाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. प्रवाशांना किती आनंद झाला आहे हे ते करत असलेल्या गरब्यावरुन (dance on station)सगळ्यांचाच लक्षात येऊ शकेल. ओढनी उड उड जाये… या गाण्यावर आणि दुसऱ्या बॉलिवूडच्या हिट गाण्यांवर ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या ग्रुपने अशा काही डान्स मूव्ह केल्या की त्यांना पाहून इतर प्रवासीही या आनंदात सहभागी झाले. या आनंदाचं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले. रतलाम स्टेशनवर ट्रेन नियोजित वेळेच्या आधी 20 मिनिटे (before time )आल्याने प्रवासी आनंदित झाले.

30 मिनिटे झाला ट्रेनचा थांबा

ही ट्रेन रतलाम स्टेशनवर बिफोर टाईम 20 मिनिटे आली. या स्टेशनवर ट्रेन 10 मिनिटे थांबते. पण गाडी 20 मिनिटे आधी आल्याने स्टेशनवर ट्रेनचा मुक्काम 30 मिनिटांचा होता. त्यामुळे प्रवाशांकडे वेळच वेळ होता. यातच ट्रेनमधून प्रवास करणारा एक ग्रुप प्लॅटफॉर्मवर आला आणि त्यांनी हा आनंद नाचून साजरा केला. 10.15 वाजता ही ट्रेन स्टेशनवर आली आणि त्यानंतर 10.45 वाजता ट्रेन स्टेशनवरुन निघाली. यातीस मिनिटंत या प्रवाशांनी भरपूर नाचण्याचा आनंद स्टेशनवर घेतला.

रेल्वेमंत्र्यांनी घेतली दखल, डान्सचा व्हिडिओ केला ट्विट

या प्रवाशांच्या रतलाम स्टेशनवरील आनंदाची दखल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्मव यांनीही घेतली आहे. त्यांनी या गाण्याचा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरुन ट्विट केला आणि मजामा, म्हणजे मजेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेन वेळेवर कशा धावतायेत आणि प्रवासी कसा आनंद व्यक्त करतायेत हे या ट्विट मधून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्यांनाही हा आनंद मिळावा

मुंबई सारख्या शहरात नोकरीसाठी दररोज लोकल प्रवासावर अवलंबून राहावे लागते. मात्र या ठिकाणी उपनगरीय लोकलच्या वेळा मात्र वेळेवर नसतात. अनेकदा लोकल वेळेवर नसल्याने कार्यालयात वेळेवर पोहचणे आणि घरी पोहचणे हे मुंबई उपनगरातींल प्रवाशांसमोरचे मोठे आव्हान असते.  या उपनगरीय लोकलच्या वेळाही या ट्रेनप्रमाणे वेळेवर व्हाव्यात. लोकलही बिफोर टाईम धावू लागाव्यात, म्हणजे मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवरही असा डान्स करण्याची संधी प्रवाशांना मिळेल अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी व्यक्त करीत आहेत. रेल्वेमंत्री प्रवाशांच्या या मागणीचा विचारही तितक्याच गांभिर्याने करतील अशी अपेक्षाही मुंबईतील प्रवासी व्यक्त करीत आहेत.