UPSC सिव्हील सेवा परीक्षेचे ( CSE ) नोटिफिकेशन जारी,काय झाला मोठा बदल वाचा….

केंद्रिय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) सनदी अधिकारी परीक्षेच्या नियमात मोठा बदल केला आहे. या बदललेल्या नियमांमुळे आता आधी इतर सेवेत निवड झालेल्या उमेदवारांवर परीणाम होणार आहे. काय झाला नेमका बदल पाहा.....

UPSC सिव्हील सेवा परीक्षेचे ( CSE ) नोटिफिकेशन जारी,काय झाला मोठा बदल वाचा....
upsc exam 2026
| Updated on: Feb 05, 2026 | 4:01 PM

केंद्रिय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) 4 फेब्रुवारी 2026 च्या सिव्हील सेवा परीक्षेचे ( CSE ) नोटिफिकेशन जारी केले आहे. यंदा आयोगाने सर्व्हीस एलोकेशन ( सेवा वाटप ) आणि डिजिटल सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत.  IPS साठीचे नियम देखील आता अधिक स्पष्ट आणि कठोर करण्यात आले आहेत.

जर एखाद्या उमेदवाराची निवड आधीच IPS साठी झाली असेल तर CSE 2026 द्वारा पुन्हा आयपीएसचा पर्याय निवडू शकत नाही. याशिवाय जर तुम्ही कार्यरत आयएएस आणि आयएफएस अधिकारी असाल तर या परिक्षेला तुम्हाला बसता येणार नाही. जर मुख्य परीक्षेआधी कोणा उमेदवाराची निवड या सेवेत झाली असेल तर त्यांना मुख्य परीक्षा देण्याची परवानगी मिळणार नाही.

जे उमेदवार CSE 2025 वा त्या आधीच कोणत्या सर्व्हीस मध्ये जॉईंट झाले आहेत त्यांना उरलेल्या प्रयत्नांचा उपयोग करण्यासाठी 2026 वा 2027 मध्ये एका अंतिम प्रयत्नांची ( राजीनामा न देतो ) संधी दिली आहे.

या उमेदवारांसाठी देखील नियमात बदल

युपीएससीने त्या उमेदवारासाठी देखील नियमात बदल केला आहे.जे 2026 मध्ये ग्रुप A सेवेत निवड झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देऊ इच्छीत आहेत त्यांना तेव्हाच परिक्षेला बसण्याची संधी मिळेल जेव्हा त्यांना संबंधित विभागातून ट्रेनिंगमध्ये सामील होण्यासाठी सुट मिळेल. परंतू जर ते ट्रेनिंगमध्ये सामील होत नाहीत आणि मूभाही घेतात, तर त्यांचा 2026 वाला अर्ज रद्द केला जाणार आहे. तसेच जर ते साल 2027 पुन्हा सफल झाले तर त्यांना दोन्हींपैकी एक सेवा निवडावी लागेल आणि दुसरी रद्द मानली जाईल.

याव्यतिरिक्त, युपीएससीच्या परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी AI -आधारित चेहऱ्याची ओळख आणि आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. उमेदवारांना आता एका नवीन चार-टप्प्यांच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. ही तपासणी संपूर्णपणे आधारकार्डशी लिंक केलेली असणार आहे.
पात्रता

भारतीय प्रशासकीय सेवेसाठी ( IAS ) अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. भारतीय वन सेवा ( IFS ) उमेदवारांकडे पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र या विषयांमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.