यांच्या मागण्या आजकाल जरा जास्तच वाढल्यात…, अन् सरन्यायाधीश न्यायाधीशांवरच संतापले, नेमकं काय घडलं?

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्त्वातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने न्यायिक अधिकार्‍यांमधील शिस्तीच्या अभावाबद्दल चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. आजकाल यांच्या मागण्या जरा जास्तच वाढल्या आहेत, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

यांच्या मागण्या आजकाल जरा जास्तच वाढल्यात..., अन् सरन्यायाधीश न्यायाधीशांवरच संतापले, नेमकं काय घडलं?
Chief Justice SuryaKant
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 8:23 PM

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्त्वातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने न्यायिक अधिकार्‍यांमधील शिस्तीच्या अभावाबद्दल चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने अत्यंत कठोर टिप्पणी करताना म्हटलं की, या अधिकाऱ्यांच्या मागण्या आजकाल जास्तच वाढल्या आहेत. याबाबत बोलताना न्याय‍धीश सूर्यकांत यांनी म्हटलं की, कर्तव्याच्या वेळी अनेकदा हे लोक आपल्या चेंबरमध्ये बसून कॉफी पीत असतात. 24 तास त्यांच्या डोक्यात आपल्याला कोणत्या सोई सुविधा मिळणार आहेत? याबाबतच सारखा विचार सुरू असतो, त्यांना फक्त मिळणाऱ्या सोई सुविधांचीच चिंता असते, असं सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर सेवेदरम्यान मिळणाऱ्या सुविधा तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ यासंदर्भात देखील अनेकदा न्यायिक अधिकाऱ्यांकडून वारंवार न्यायालयात दाद मागितली जाते, यावर देखील या खंडपीठाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

केरळ हाय कोर्टाच्या जुबिया ए बनाम प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस जॉटमाल्य बागची आणि जस्टिस व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने न्यायव्यवस्थेला शिस्तीची गरज असल्याचं म्हटलं आहे. ही सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांनी म्हटलं की, आजकाल यांच्या मागण्या जरा जास्तच वाढल्या आहेत. आम्हाला माहिती आहे की, ते किती काम करतात, आणि दिवसभर काय करतात? तुम्ही न्यायालयात दहा वाजता जा, तरी देखील ते तुम्हाला त्यांच्या जागेवर भेटणार नाहीत. ते चेंबरमध्ये बसून कॉफी पीत असतात. त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असतो की आपल्याला काय सुविधा मिळणार आहेत?

Loading...

पुढे बोलताना सरन्यायाधीशांनी असं देखील म्हटलं की, तुम्ही वारंवार सेवा, निवृत्तीचं वय, तुम्हाला मिळणाऱ्या इतर सुविधा आणि भत्त्यांसंदर्भात आवाज उठवत आहात. तुम्हाला असं वाटतं की तुमच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. परंतु आम्हाला सगळं माहिती आहे की, तुम्ही दिवसभरात किती काम करता, यावेळी बोलताना सरन्यायाधीशांनी न्यायिक अधिकाऱ्याच्या थेट कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी बोलताना त्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us