विमानात असते सीक्रेट रूम, जिथे आम्ही.., पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच एअर होस्टसने सांगितलं ते हादरवणारं काळं सत्य, म्हणाली सगळ्यांनाच..
अनेकांना एअर होस्टेस, पायलट किंवा विमान क्षेत्राशी संबंधित नोकरीचं कायमच आकर्षण असतं. परंतु या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना दररोज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? याबाबत मात्र आपल्याला कोणतीही माहिती नसते.

प्रत्येकाची अशी इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करायचाच, विमानाचा प्रवास हा बस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही प्रवासापेक्षा महागडा असल्यामुळे प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. परंतु तरी देखील अनेकजण आपल्या आयुष्यात कधी न कधी विमानातून प्रवास करण्याचा आनंद घेतात. विमानातून प्रवास केल्यानंतर आपल्याला प्रवासादरम्यान जे काही चांगले, वाईट अनुभव आले, ते अनुभव देखील असे प्रवासी आपल्या मित्र किंवा नातेवाईकांसोबत शेअर करत असतात. तर दुसरीकडे असे देखील काही लोक असतात, जे दररोज किंवा अनेकदा विमानाने प्रवास करत असतात, त्यामुळे विमानातून प्रवास करणं ही काही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नसते. विमानाच्या मदतीने तुम्ही हजारो किलोमीटरचं अंतर अवघ्या काही तासांमध्ये सहज पार करू शकतात, एका देशामधून दुसर्या देशामध्ये जाऊ शकतात. मात्र विमानामध्ये देखील अशा अनेक गोष्टी असतात, ज्याबद्दल प्रवाशांना फार काही माहिती नसते.
सर्वसाधारणपणे एका विमानामध्ये दोन पायलट, इतर क्रू मेंबर्स, एअर होस्टेस असा स्टाफ असतो. विमान किती मोठं आहे? यावर क्रू मेंबर्सची संख्या देखील अवलंबून असते. प्रवास सुरक्षित व्हावा, प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हे क्रू मेंबर्स प्रचंड मेहनत घेत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे एअर होस्टेसची. तु्म्ही जर कधी विमानाने प्रवास केला असेल तर प्रवाशांची मदत करताना तुम्ही एअर होस्टेसला पाहिलच असेल.
अशाच एका एअर होस्टेसने एका पॉडकास्टमध्ये आपल्या नोकरीचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की अनेकदा लांब पल्ल्यांचा प्रवास असतो. या प्रवासादरम्यान प्रवाशांना सेवा देताना प्रचंड थकवा येतो. तास न तास उभं राहण्याची वेळ देखील येते. शारीरिक त्रास तर असतोच परंतु अनेकदा मानसिक त्रास देखील होतो. विमानात एक सिक्रेट रूम असते, जिथे आम्ही आराम करू शकतो, परंतु तिथे देखील फार काळ आराम करता येत नाही, सर्वांनाच आराम करायचा असतो, आम्हाला कायम अलर्ट मोडवर राहवं लागतं, असं या एअर होस्टेसने म्हटलं आहे.