
आज कल लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण पाश्चात्य देशांप्रमाणे भारतात देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये दोन प्रेमी लग्न न करता पती-पत्नी सारखं एकाच घरात राहतात. तुम्हाला माहिती आहे का ? जगात असे कोणते देश आहेत जेथे सर्वाधिक कपल्स लिव्ह -इनमध्ये रहातात आणि भारता या नात्यात राहणाऱ्यांचे प्रमाण पाहाता भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
अलिकडेच झालेल्या एका अभ्यासानुसार जगात सर्वाधिक लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण स्वीडनमध्ये आहे. येथे सुमारे ७० लोक लग्नाविना एकत्र राहणे पसंद करतात. अर्थात यातील ४० टक्के जोडपी काही काळानंतर वेगवेगळी होतात. तर केवळ १० टक्के जोडपी जीवनभर एकत्र रहातात. स्वीडननंतर या प्रकारे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नॉर्वेचा आणि डेन्मार्कचा नंबर येतो.
भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचा योग्य अचूक आकडा सध्या उपलब्ध नाही, कारण या प्रकरणात कोणतीही अधिकृत जनगणना किंवा सर्वेक्षण झालेले नाही. काही अहवालाच्या मते ही प्रथा वेगाने वाढत आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की प्रत्येक १० पैकी एक जोडप्यापैकी १ जोडपे भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात आहे.
➤ वाढते प्रमाण : भारतात ही प्रथा मुख्यत्वे महानगरात असून यात दिल्ली, मुंबई, बंगलुरु आणि पुणे या शहरात आहे.
➤ प्रमुख कारणे : शहरीकरण, आधुनिकीकरण आणि पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव ही प्रमख कारणे यामागे मानली जात आहेत. यात एकमेकांना समजण्याची संधी मिळत असते त्यामुळे अशा नात्यांमध्ये तरुण राहात असतात.
➤ कायदेशीर मान्यता : अलिकडेच उत्तराखंड राज्यात समान नागरिक संहिता (UCC) लागू झाल्यानंतर येथे पहिल्यांदा एखाद्या जोडपाल्याला लिव्ह-इनमध्ये राहण्याची कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
अर्थात भारतात सामाजिक स्वरुपात अजूनही या नात्यांना स्वीकारण्यात आलेले नाही. आणि भारतासारख्या रुढी आणि परंपरा असलेल्या देशात हे एक मोठे आव्हान बनले आहे.