हॉटेलच्या रूममधली ही वस्तू कधीच धुतली जात नाही, चुकनही लावू नका हात, हॉटेल कामगारानं जे सांगितलं ते ऐकून बसेल धक्का

तुम्ही देखील कधी न कधी हॉटेलमध्ये गेलाच असाल, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सामान्यपणे काय अनुभव येतो? तुम्ही ज्या रूमध्ये स्टे करणार आहात, ती रूम तुम्हाला खूपच स्वच्छ आणि चकाचक वाटली असेल, मात्र ही माहिती वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

हॉटेलच्या रूममधली ही वस्तू कधीच धुतली जात नाही, चुकनही लावू नका हात, हॉटेल कामगारानं जे सांगितलं ते ऐकून बसेल धक्का
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2025 | 7:51 PM

तुम्ही देखील कधी न कधी हॉटेलमध्ये गेलाच असाल, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सामान्यपणे काय अनुभव येतो? तुम्ही ज्या रूमध्ये स्टे करणार आहात, ती रूम तुम्हाला खूपच स्वच्छ आणि चकाचक वाटली असेल, मात्र थोडं थांबा हॉटेलमधील रूम स्वच्छ आणि चकाचक ठेवण्यामागे देखील फार मोठं रहस्य दडलेलं आहे. त्या रूमध्ये अशा देखील काही गोष्टी असतात ज्या कधीच धुतल्या जात नाहीत, आणि त्या हॉटेलमध्ये आलेले लोक देखील या वस्तूंचा सर्रासपणे वापर करतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील व्यक्तीने अशा गोष्टींबद्दल माहिती दिली आहे, आणि लोकांना असा सल्ला देखील दिला आहे की, या वस्तू तुम्ही कधीच वापरू नका.

तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता, चेक इन करता आणि तुम्ही खूप थकलेले असता, त्यामुळे लगेचच साफ आणि खूपच स्वच्छ वाटणाऱ्या बेडवर झोपून जाता. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की बाहेरून खूपच स्वच्छ वाटणारे हे बेड आणि त्यावर अंथरण्यात आलेल्या चादरी आतमधून किती अस्वच्छ असतात? याबाबत एका माजी हॉटेल कर्मचार्‍याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये त्याने एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे, त्याने केलेल्या दाव्यानुसार हॉटेल रूमध्ये बेडला सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चादरी या वारंवार धुतल्या जात नाहीत, त्यामुळे अशा चादरींपासून, बेडशीटपासून दूरच रहा, तसेच त्या आणखी अस्वच्छ करू नका.

अनेक जण बेडवर सजावटीसाठी टाकलेलं हे बेडशीट काढून टाकतात, मात्र तरी देखील त्याचा उपयोग करतातच काही जण त्याच्यावर सामान ठेवतात, काही जण बसण्यासाठी त्याचा उपयोग करतात, मात्र असं करण देखील चुकीचं असल्याचं या हॉटेल कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे. बेड सजवण्यासाठी ज्या कव्हरचा वापर होतो, त्या कव्हरला महिना-महिना देखील धुतलं जात नाही, कारण अशा कव्हरचा समावेश हा डेकोरेटिव्ह रनर सॉफ्ट गुड्स श्रेणीमध्ये होतो, हे “non-barrier” श्रेणीमध्ये असल्यानं त्याला रोज धुण्याचं बंधन हे संबंधित हॉटेलवर नसतं.