मालदीव पेक्षा ही सुंदर आहे भारतातील हे ठिकाण, पाहा कुठे वसले आहे हे बेट

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे मालदीवलाच मोठा फटका बसला आहे. मालदीवकडे आता भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मालदीवनंतर आता भारतातील पर्यटन स्थळांना विकसित करण्यासाठी सरकारने देखील सुरुवात केली आहे. मालदीव सारखेच आपल्या देशात एक ठिकाण आहे. ज्याला तुम्ही भेट देऊ शकतात.

मालदीव पेक्षा ही सुंदर आहे भारतातील हे ठिकाण, पाहा कुठे वसले आहे हे बेट
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 4:53 PM

Indian tourist Place : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहे. पण याचा सर्वाधिक फटका हा मालदीवलाच बसला आहे. भारतातून सर्वाधिक पर्यटक हे मालदीवला जात होते. पण आता याबाबतीत भारतीयांची संख्या पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्यांची मंत्रीपदावरुन हक्कालपट्टी करणार आली होती. पण भारताने यानंतर बायकॉट मालदीव अशी मोहिमच सुरु केली होती. मालदीव हे जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण भारतात मालदीवपेक्षाही सुंदर ठिकाण आहे.

१०० बेटांचे पर्यटन स्थळ

राजस्थानमधील बांसवाडा शहरात एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या शहरात सुमारे 100 बेट आहेत. त्यामुळे या शहराला बेटांचे शहर असेही म्हणतात. माही नदीच्या आत ही लहान बेटे आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटात देखील पाण्याने वेढलेली ही सुंदर नैसर्गिक बेट आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. माही नदी आणि ही बेटे एकत्र पाहिल्यावर एक अप्रतिम नजारा दिसतो. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. त्यावेळी येथे ढग असतात त्यामुळे ते एखाद्या हिल स्टेशनसारखे दिसतात.

पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र

हे ठिकाण पाहिल्यास मालदीवमध्ये आल्यासारखे वाटेल. पाण्याच्या आत असलेली छोटी बेटे इतकी सुंदर दिसत आहेत की इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. बांसवाडा हे राजस्थानच्या दक्षिण भागात वसले आहे. ४० किलोमीटर परिसरात वसलेल्या या शहराचे सौंदर्य येथे वाहणाऱ्या माही नदीने आणखीनच वाढवले ​​आहे. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर एका दिवसात तुम्ही इथे सहज पोहोचू शकता.

हे पर्यटन स्थळ विकसित करणार सरकार

तुम्ही या ठिकाणी बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक प्रकारचे वन्य प्राणी येथे पाहायला मिळतील. हे ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत असे वाटणारच नाही. अनेकांना अजून या ठिकाणाची माहिती नाही. त्यामुळे येथे फारशी गर्दी होत नाहीय मात्र राजस्थान सरकार आता हे ठिकाण नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.