ही वनस्पती म्हणजे सापांपासून कायमचा सुटकारा; पावसाळ्यात घरात लावलीच पाहिजे, साप घरातूनच नाही तर परिसरातूनही होतात गायब

नुसतं सापाचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना भीती वाटते, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर साप घरात घुसण्याचं प्रमाण देखील वाढतं. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात संर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. सतर्कता हाच सर्पदंश होऊ नये यासाठीचा प्रभावी उपाय आहे, परंतु असे देखील काही झाडं असतात जे सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

ही वनस्पती म्हणजे सापांपासून कायमचा सुटकारा; पावसाळ्यात घरात लावलीच पाहिजे, साप घरातूनच नाही तर परिसरातूनही होतात गायब
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 9:00 PM

पावसाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतु असे आहेत, या काळात भारतामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यात जमीन गरम होत असल्यामुळे उष्णतेचा सापाला त्रास होतो आणि तो थंड जागेचा शोध घेतो. अशावेळी साप बिळातून बाहेर पडून तुमच्या घरात घुसू शकतो. किंवा जर तुमच्या घराजवळ बाग असेल तर बागेतील एखाद्या झाडाचा देखील तो आश्रय घेऊ शकतो. अशावेळी जर तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी सर्पदंशाचा धोका वाढतो. पावसाळ्यात देखील सापांच्या बिळात पाणी घुसल्यानं ते बाहेर पडतात आणि कोरड्या जागेचा शोध घेतात, उन्हाळ्यापेक्षाही पावसाळ्यात साप तुमच्या घरात घुसण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. तुम्हाला जर तुमच्या घरात किंवा परिसरात कुठेही साप दिसला तर एका गोष्टीची आवश्य काळजी घ्या, ती म्हणजे सापांना पकडू किंवा मारू नका. तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतील. सापांबद्दल माहिती नसताना थेट त्यांना पकडणं हे तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात, परंतु त्यातील अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच साप हे विषारी आहेत. विषारी सापांमध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या प्रमुख चार जातींचा समावेश होतो. या प्रजाती महाराष्ट्रात देखील सर्वत्र आढळतात. या सापांनाच बिग फोर असं देखील म्हटलं जातं. तर काही जाती या निमविषारी असतात तर काही सापांच्या प्रजाती या पूर्णपणे बिनविषारी असतात. त्यामुळे तुम्हाला साप चावला तर घाबरून जाऊ नका. साप चावल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत घ्या, थोडासुद्धा वेळ वाया घालू नका, कारण त्यामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. सर्पदंश झालेल्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळून देणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. परंतु निसर्गात अशी देखील काही झाडं असतात, ज्या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप त्या परिसरात येत नाहीत.

अफुमारीचा वेल ही देखील एक अशीच वनस्पती आहे, या वनस्पतीच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ही वनस्पती जिथे असेल तेवढ्या परिसरात साप चुकूनही येत नाही. या वनस्पतीला तीव्र असा कडू वास असतो. या वासाचा सापांना त्रास होतो, त्यामुळे ही वनस्पती ज्या परिसरात असते, तिथे साप येत नाहीत, असं मानलं जातं. आजही ग्रामीण भागांमध्ये साप घरात येऊ नये, म्हणून अनेक लोक हे झाड आपल्या घरात लावतात. या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. तसेच या वनस्पतीमुळे घरात साप देखील येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात ही वनस्पती अनेक जण आपल्या घरात लावतात.

 

Follow Us