AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश

रेल्वेच्या प्रवासात केवळ तिकीट मिळाले नाही म्हणून मृत प्रवाशाच्या वारसदाराला नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश
sc court major rule
| Updated on: Jul 17, 2026 | 9:15 PM
Share

रेल्वे अपघातात ठार झालेल्या प्रवाशाकडे तिकीट मिळाले नाही म्हणून त्याला अनधिकृत प्रवासी ठरवणे योग्य नाही. यात कोणताही वाद नाही की प्रवासी त्या ट्रेनमधून प्रवास करत होता, त्या अप्रिय घटनेत त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या पत्नीने अपघातात पर्स हरवल्याने तिकीट हरवल्याचे म्हटले आहे त्यामुळे पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून अपघातात मिळणारी ८ लाखांची रक्कम व्याजासह मृताच्या पत्नीला देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सेंकड क्लास पॅसेंजर या शब्दावर आपत्ती

सेंकड क्लास पॅसेंजर ( दुसऱ्या श्रेणीचा प्रवासी ) या शब्दाला सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने रेल्वेने आपली परिभाषा बदलली पाहिजे असे म्हटले आहे. कोर्टाने लोकांऐवजी कोचना वेगवेगळ्या श्रेणीत विभागावे असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले.

भारतीय रेल्वेतील सुधारणा आणि प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. याचिकेत रेल्वेच्या दस्तावेजात वापरलेल्या सेकंड क्लास पॅसेंजर शब्दावर न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने आक्षेप व्यक्त केला. देशाच्या इतिहासात वर्गभेदाचा पार्श्वभूमी असल्याने कोणा व्यक्तीला या प्रकारे संबोधित करणे घटनेच्या विरोधात असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांत वाढ करा

रेल्वे मॅन्युअलच्या अनेक तरतूदींना प्रभावीपणे लागू करण्यासाठी अधिक कर्मचाऱ्याची गरज आहे. रेल्वे स्थानके आणि ट्रेनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्येत वाढ करावी लागेल. देशात आधुनिकीकरणाच्या काळात रेल्वेमध्ये तरुणांना रोजगार देण्याने न केवळ त्यांना स्थायी रोजगार मिळेल, तर प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी देखील मदत होईल.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा