AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड म्हणजे सापांचा खास दोस्त, घरापासून थोडं दूरच लावा, अन्यथा तुमचं घर बनेल सापांचा अड्डा

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये साप अनेकदा पाण्यापासून बचावासाठी सुरक्षित जागी दडून बसतात, किंवा रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा ते तुमच्यावर हल्ला देखील करू शकतात.

हे झाड म्हणजे सापांचा खास दोस्त, घरापासून थोडं दूरच लावा, अन्यथा तुमचं घर बनेल सापांचा अड्डा
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 9:03 PM
Share

पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात पूर, अतिवृष्टी, वादळी वारा, विजा यांचा जसा धोका असतो, तसाच आणखी एक मोठा धोका असतो तो म्हणजे सर्पदंशाचा. कारण या काळात सापांच्या बिळात पाणी गेल्यामुळे किंवा जिथे त्यांचं पूर्वीचं आश्रयस्थान होतं, तो भाग पाण्यात गेल्यामुळे साप तिथून बाहेर पडतात. पाण्यामुळे आधीच साप घाबरलेले असतात, अशा स्थितीमध्ये जर तुमचा आणि त्यांचा संर्पक झालाच तर ते तुमच्यावर हल्ला करण्याची देखील शक्यता असते. पावसाळ्याच्या काळात साप अनेकदा बिळातून बाहेर पडून रस्त्यावर येतात. साप पावसाच्या दिवसांमध्ये नेहमी कोरड्या आणि सुरक्षित जागेचा शोध घेत असतात, अशावेळी ते तुमच्या घरात घुसण्याचा धोका देखील वाढतो. तसेच ते तुमच्या कॉलनीमध्ये देखील येऊ शकतात.

जर समजा तुम्हाला तुमच्या घरात किंवा कुठेही कॉलनीमध्ये साप आढळून आला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करून  नका त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या, ते सापांना त्यांच्या सुरक्षित आधिवासात सोडतील. यामुळे सापांचा देखील जीव वाचेल आणि तुमचाही बचाव होईल. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? निसर्गात अशी काही झाडं असतात, जी सापांना स्वत:कडे आकर्षित करतात. या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो.

असंच एक झाड आहे, ते म्हणजे चंदनाचं. या झाडाच्या आसपास अनेकदा साप दिसून येतात. या झाडाची रचनाच अशी असते की साप या झाडाकडे आकर्षित होतात. याचं मुख्य कारण म्हणजे चंदनाच्या झाडाला जी फळं लागतात, ती फळं पक्ष्यांचं आवडतं खाद्य असतं, त्यामुळे पक्षी अनेकदा चंदनाच्या झाडावरच आपलं घरटं देखील तयार करतात. पक्षी आणि पक्ष्यांची अंडी हे सापाचं खाद्य असल्यामुळे साप नेहमी या झाडाच्या आसपासच राहतात. संधी मिळताच ते पक्ष्यांची शिकार करतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चंदनाची सावली गार असल्यामुळे देखील साप अनेकदा या झाडाभोवती वास्तव्य करतात. त्यामुळे शक्यतो चंदनाचं झाडं हे घरापासून थोड दूर किंवा शेतात लावावं.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक