त्या भ्याड कृत्यामुळे भारत आक्रमक; अमेरिकेला थेट मोठा इशारा, तातडीने नवी अ‍ॅडव्हायझरी लागू

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली असून त्यानंतर भारताने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.

त्या भ्याड कृत्यामुळे भारत आक्रमक; अमेरिकेला थेट मोठा इशारा, तातडीने नवी अ‍ॅडव्हायझरी लागू
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 5:35 PM

ओमानच्या समुद्र किनार्‍यावर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर सातत्याने हल्ले सुरूच आहे. गेल्या चार दिवसांमध्ये भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे कार्यकारी राजदूत जेशन मिक्स यांना परराष्ट्र मंत्रायलाच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं. तब्बल 45 मिनिटं अमेरिकेचे राजदूत हे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑफीसमध्ये होते. नुकताच ओमानच्या किनार्‍याजवळ एका जहाजावर हल्ला करण्यात आला, या जहाजांवर 20 भारतीय क्रू मेंबर्स होते. गेल्या चार दिवसांमध्ये ही तिसरी घटना आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे कार्यकारी राजदूत जेशन मिक्स यांना कार्यालयात बोलवले होते, तसेच भारताकडून या घटनेवर चिंता व्यक्त करण्यात आली असून, हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. ओमानच्या खाडीमध्ये आणि त्याच्या आसपास काम करणाऱ्या जवळपास 18,000 भारतीय नाविकांसाठी सुरक्षेबात परराष्ट्र मंत्रालयाकडून नवी अॅडवाइजरी जारी करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या तीन जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. या घटनांमध्ये तीन नाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. ओमानच्या खाडीमध्ये अमेरिकेच्या नौदलाकडून व्यापारी जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये भारतीय क्रू मेंबर्स असलेलया तीन जहाजांवर अमेरिकन नौदलाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. ही घटना थांबवता आली असती, व्यापारी जहजारांवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करणं हे चिंताजनक गोष्ट आहे, यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा इशारा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अमेरिकेला देण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील भारताने अमेरिकेच्या राजदूताला पत्र पाठवलं होतं. मात्र त्यानंतर देखील भारतीय क्रू मेंबर असलेल्या एका जहाजावर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला आहे.

 

Follow Us