
भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीचं स्वागत केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपण्याची जग वाट पाहात असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. “युक्रेनमधील आमच्या मित्रांना शांती, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्याच्या शुभेच्छा” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. त्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे. अमेरिकेच्या अलास्कामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास चर्चा सुरू होती.या बैठकीनंतर ट्रम्प आणि पुतिन यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं, ही बैठक युद्धविरामाच्या चर्चेसाठी आयोजित करण्यात आली होती, मात्र यातून फार काही हाती लागलं नाही.या युद्धात जखमी आणि मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा आता दहा लाखांवर पोहोचला आहे.
Thank you President Zelenskyy for your warm greetings. I deeply value the joint commitment to forging even closer ties between India and Ukraine. We earnestly wish our friends in Ukraine a future marked by peace, progress and prosperity.@ZelenskyyUa https://t.co/g5HYuCuIRo
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2025
भारताकडून बैठकीचं स्वागत
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी या बैठकीबाबत एक निवेदन जारी केलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, भारत ट्रम्प आणि पुतिन यांच्या या बैठकीचं स्वागत करतो. शांततेसाठी सुरु असलेले त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भारत या बैठकीचं कौतुक करतो. चर्चेच्या माध्यमातूनच हा प्रश्न सुटू शकतो. आता जगाला लवकरात लवकर रशिया आणि युक्रेमध्ये युद्धविराम पाहायचा आहे, असं निवेदनामध्ये म्हटलं आहे.
तीन तास चर्चा
दरम्यान पुतिन आणि ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी तब्बल तीन तास चर्चा सुरू होती. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम यावर चर्चा झाली. मात्र या बैठकीमधून फार काही साध्य झालं नसल्याची माहिती समोर आली आहे.