Ticket Booking Rule: रेल्वेचा मोठा बदल, अवघ्या 45 पैशांत 10 लाखांची सुविधा, तुम्हाला माहिती आहे का?

Ticket Booking Rule: रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. त्यांना ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईनही मोठी सुविधा मिळणार आहे. काय आहे याविषयीचा निर्णय?

Ticket Booking Rule: रेल्वेचा मोठा बदल, अवघ्या 45 पैशांत 10 लाखांची सुविधा, तुम्हाला माहिती आहे का?
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांची सुविधा
| Updated on: Nov 22, 2026 | 2:11 PM

Ticket Booking Rule: रेल्वेने एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेल्वे स्थानकांवरील आरक्षित काऊंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना प्रवाशी विम्याची सुविधा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यापासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात याविषयीची निर्देश दिले होते. यामुळे ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही ऑफलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना विमा सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

अवघ्या 45 पैशांत 10 लाखांची सुविधा

Loading...

आयआरसीटीसीच्या (IRCTC) नियमाप्रमाणे साईटवरून अथवा मोबाईल प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना ऐच्छिक विम्याचा पर्याय उपलब्ध होता. पण थेट रेल्वे स्थानकावरील काऊंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. जे प्रवाशी डिजिटल तिकीट बुक करू शकत नव्हते अथवा जे प्रामुख्यांना काऊंटरवरूनच तिकीट काढतात, त्यांना विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाईन बुकिंगच्या धरतीवर ऑफलाईन तिकिटावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, मृत्यू अथवा कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या प्रवाशांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हरेज, विमा कवच मिळते. सध्या ऑनलाईन विम्याचा दर ४५ पैसे इतका आहे. काऊंटरवरील दरातही पार मोठा बदल होणार नसल्याची चर्चा आहे. रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवर यासंबंधीची माहिती प्रवासी घेऊ शकतील.

सर्वोच्च न्यायालयाने अन्याय केला दूर

जून २०२३ मध्ये ओडिशात रेल्वे अपघात झाला होता. त्यानंतर रेल्वे सुरक्षेशी संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ६ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच देण्यासंबंधीचे निर्देश दिले होते. तर आश्वासनानंतरही ऑफलाईन, काऊंटरवर जाऊन विमा कवच न दिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी न्यायालयाने २७ ऑक्टोबर रोजीपर्यंत ही सुविधा लागू करण्याची मुदत दिली होती. तसेच रेल्वे बोर्डाला खडसावलेही ही होते. आता ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन प्रवाशांना विम्याची सुविधा मिळाल्याने सेवेतील आणि सुरक्षिततेतील तफावत दूर झाली आहे. अर्थात ही सुविधा ऐच्छिक आहे. तुम्ही तिकीट काऊंटरवर याविषयीची विचारपूस करू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us