
मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार मुस्ताक ऊर्फ टायगर मेमन याची माहीम येथील प्रॉपर्टी केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश विशेष टाडा कोर्टाने दिले आहेत. आतापर्यंत ही मालमत्ता मुंबई हायकोर्टाच्या ताब्यात होती. टायगरचा भाऊ याकुब मेमनला साल 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याला हुतात्मा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि त्यावरुन राजकारण देखील रंगले होते. कुख्यात आरोपी टायगर मेमन हा त्याची पत्नी शबानासह मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर फरार झालेला आहे. माहिमच्या अल हुसैनी इमारतीत त्याच्या कुटुंबियाचे तीन फ्लॅट आहेत. या मालमत्तेवर साल 1994 मध्ये टाडा कोर्टानेच जप्ती आणली होती. कोण आहे टायगर मेमन ? ज्याने माफीया डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने साल 12 मार्च 1993 च्या देश हादरविणाऱ्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा कट रचला ? पाहूयात…. ■ काळा शुक्रवार ! 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर...