DIWALI 2026 Shankarpali Recipe : तोंडात टाकताच विरघळणारी, खमंग, खुसखुशीत शंकरपाळी एका चुटकीत करा तयार
दिवाळीच्या फराळात शंकरपाळी छोटीशी पण गोडवा देणारा पदार्थ असतो. बऱ्याच लोकांच्या शंकरपाळ्या या कडक होतात. काय करावं ते सूचतच नाही. त्यामुळे या टिप्स आणि शंकरपाळीची रेसिपी ट्राय करा म्हणजे तुमची शंकरपाळी खुसखुशीत आणि खमंग देखील होईल.

खुसखुशीत, खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी करायची असेल, तर पीठ मळण्याची पद्धत आणि सर्व पदार्थांचे पीठात केले जाणारे मिश्रण योग्य असणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची.
साहित्य : मैदा- 2 वाट्या, साखर 1 वाटी, पाणी किंवा दूध १ वाटी (साखर विरघळवण्यासाठी),साजूक तूप (किंवा तेल): ३ ते ४ मोठे चमचे (मोहनसाठी) आणि तळण्यासाठी तूप/तेल, मीठ: चिमूटभर, वेलची पूड: अर्धा छोटा चमचा
एका पातेल्यात 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी किंवा दूध घालून मंद आचेवर फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करा. (साखरेचा पाक करायचा नाही ) फक्त साखर पाण्यात किंवा दूधात विरघळली पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
मिक्स करणे आणि पीठ मळणे :एका मोठ्या परातीत मैदा, चिमूटभर मीठ, आणि वेलची पूड एकत्र करून घ्या. आता साखर विरघळवलेलं दूध थोडं थोडं घालत पीठ घट्ट मळून घ्या.
मळलेलं पीठ झाकून साधारण 20 ते 30 मिनिटं बाजूला ठेवा. यामुळे शंकरपाळी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यास मदत होते.
आता पीठाचा गोळा घेऊन पोळीसारखा मोठा लाटून घ्या. खूप पातळ किंवा खूप जाड लाटू नका. त्यामुळे एक शंकरपाळी जाड आणि दुसरी पातळ व्हायची.
सुरी किंवा चिरणीने छोटे छोटे चौकोनी किंवा हिऱ्याच्या आकाराचे तुकडे कापून घ्या. जास्त लांबट किंवा छोटे कापू नका.
कढईत तेल गरम करा. तेल खूप कडकडीत गरम करू नका. त्यामुळे शंकरपाळ्या जळून जातील. किंवा जास्त कडक होतील. मध्यम ते मंद आचेवर शंकरपाळी सोनेरी होईपर्यंत तळा.
शंकरपाळी बाहेरून छान तळली गेली असली तरी लगेच डब्यात भरू नका. त्याला हवा लागू द्या. पूर्ण थंड होऊ द्या. त्यामुळे त्यांचा खुसखुशीतपणा टिकून राहतो.