AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाची दिवाळी 5 राशींसाठी ठरणार खास; आर्थिक लाभासह मिळतील यशाच्या नव्या संधी

यंदाची दिवाळी ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींसाठी विशेष भाग्यशाली ठरणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळू शकतात. जाणून घेऊया, कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.

यंदाची दिवाळी 5 राशींसाठी ठरणार खास; आर्थिक लाभासह मिळतील यशाच्या नव्या संधी
diwali 2026
| Edited By: | Updated on: Nov 06, 2026 | 8:31 PM
Share

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि समृद्धीचा सण मानला जातो. यंदा ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या सणाला देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करून सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अनुकूल ठरू शकते. त्यामुळे 5 राशींच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्यासोबतच नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत या पाच भाग्यवान राशी.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची दिवाळी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आर्थिक अडचणी कमी होण्यासोबतच उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. बऱ्याच काळापासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा काळ अनुकूल ठरू शकतो. पैशांशी संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायातही कमाईच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाल्याने महत्त्वाची कामे पूर्ण करणे सोपे जाईल. घरासाठी सुख-सुविधांच्या वस्तू खरेदी करण्याचे नियोजन होऊ शकते.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची दिवाळी विशेष ठरू शकते. गुरु ग्रह तुमच्याच राशीत असल्याने करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांना नवीन करार किंवा महत्त्वाच्या व्यवहारातून फायदा होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.

तूळ तूळ राशीच्या लोकांना दिवाळीच्या काळात आर्थिक लाभ होईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात आखलेल्या नवीन योजना यशस्वी होतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक प्रेमळ आणि आनंदी होईल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळी भाग्यशाली ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि कामाचे कौतुक होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. व्यावसायिकांना नफ्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहिल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?