रेमडेसिवीर रामबाण उपाय नाही, देशातील 3 मोठ्या डॉक्टरांकडून कोरोनावर मात करण्याचा ‘हा’ उपाय

| Updated on: Apr 21, 2021 | 8:26 PM

देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना कोरोना उपचारावरील काही प्रभावी गोष्टी सांगितल्यात.

रेमडेसिवीर रामबाण उपाय नाही, देशातील 3 मोठ्या डॉक्टरांकडून कोरोनावर मात करण्याचा हा उपाय
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाने गोंधळ उडालाय. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढलीय की रुग्णांना बेड आणि आवश्यक औषधं देखील मिळणं अवघड होऊन बसलंय. यात रेमडेसिवीर औषधाची कमतरता हा सर्वात मोठा मुद्दा ठरतो आहे. त्यामुळेच देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यात त्यांनी कोरोना उपचारावरील काही प्रभावी गोष्टीही सांगितल्यात. याय 3 डॉक्टरांमध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Dr Randeep Guleria), नारायणा हेल्थचे प्रमुख डॉ. देवी शेट्टी (Dr Devi Shetty, Chairman, Narayana Health) आणि मेदांताचे प्रमुख नरेश त्रेहान (Dr Naresh Trehan of Medanta) यांचा समावेश आहे (Top 3 Indian doctors on Corona treatment and Remdesivir injection use).

रेमडेसिवीर औषधाबाबत बोलताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिवीर हे काही जादुई औषध नसल्याचं स्पष्ट केलंय. केवळ काही टक्के रुग्णांनाच याची गरज असते असंही ते म्हणाले. डॉ. नरेश त्रेहान यांनीही रेमेडेसिवीर रामबाण उपाय नसल्याचं सांगितलं. तसेच हे औषध केवळ गरजू रुग्णांमधील विषाणूचा प्रभाव कमी करतं असं नमूद केलं.

कोरोनाबाबत तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या सूचना काय?

डॉ. देवी शेट्टी यांनी कोरोना रुग्णांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, “कोणत्याही व्यक्तीच्या शरिरात 94 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही. मात्र, शरिरातील ऑक्सिजनची पातळी त्यापेक्षा कमी झाली तर ते चिंताजनक आहे. यावेळी तुम्हाला डॉक्टरांच्या उपचाराची गरज आहे. अशा परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळणं अत्यावश्यक आहे.”

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असेल आणि कोणतंही लक्षण नसल्यास काय करावं?

जर एखाद्या व्यक्तीची चाचणी पॉझिटीव्ह आली आणि त्याला कोणतंही कोरोनाचं लक्षण नसेल तर अशा रुग्णांना डॉक्टरांनी घरी राहण्याचा सल्ला दिलाय. घरीच राहून दर 6 तासांनी ऑक्सिमीटरच्या सहाय्याने आपली ऑक्सीजनची पातळी तपासत राहावी. जर एखाद्या व्यक्तीला अंगदुखी, सर्दी, खोकला, अपचन, उलट्या अशी लक्षणं असतील तर त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करावी. ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

“देशात पुरेसा ऑक्सिजन मात्र अयोग्य वापर”

डॉ. नरेश त्रेहान यांनी दावा केलाय की आपल्याकडे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आहे. आपल्याला केवळ हा ऑक्सिजन योग्य पद्धतीने वापरण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “लोकांनी ऑक्सिजनची गरज नसेल तर केवळ खबरदारी म्हणून ऑक्सिजनचा वापर करु नये. ऑक्सिजन वाया घालवल्याने देशातील गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळणार नाही.”

हेही वाचा :

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचं ठाणे मनपाविरोधात आंदोलन, मनसेच्या अविनाश जाधवांची साथ!

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची NIA आणि ED मार्फत चौकशी करा : अशोक चव्हाण

Remdesivir Price List: कोरोनावरील ‘रामबाण’ उपाय! बाजारात ‘या’ 7 कंपन्यांचं रेमडेसिविर उपलब्ध, किंमत किती?

व्हिडीओ पाहा :

Top 3 Indian doctors on Corona treatment and Remdesivir injection use