जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचं ठाणे मनपाविरोधात आंदोलन, मनसेच्या अविनाश जाधवांची साथ!

prajwal dhage

|

Updated on: Apr 20, 2021 | 5:53 PM

सर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या आहेत (jitendra awhad ruta awhad)

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचं ठाणे मनपाविरोधात आंदोलन, मनसेच्या अविनाश जाधवांची साथ!
RUTA AWHAD

Follow us on

ठाणे : राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. दररोज हजारो नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. मृतांची संख्यासुद्धा वाढली आहे. रोज हजारोच्या संख्येने नवे कोरोनाग्रस्त आढळत असल्यामुळे राज्यात आरोग्यव्यवस्था तोकडी पडू लागली आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेवर थेट ठिय्या आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी ऋता आव्हाड ( Ruta Awhad) यांच्यासोबत मनसेनेचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. (wife of Jitendra Awhad Ruta Awhad protested in front of Thane Municipal office on shortage of Oxygen cylinder and Remdesivir for treatment of Corona patients)

ऋता आव्हाड यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्ते

ठाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथे रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथे आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहेत. रुग्णांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शन वेळेवर मिळत नाहीये. याच प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड याच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या. त्यांनी ठाणे महापालिकेच्या दालनाखाली ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हरच्या तुटवड्याबाबत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मनसेचे ठाण्याचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. तसेच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवदेखील मनसे कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडुन बसले होते. यावेळी ऋता आव्हाड यांनी ठाणे महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ठाणे महापालिकेवर आरोग्य व्यवस्थेशी संबंधित अनेक आरोप केले.

ऑक्सिजन फलक आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ठिय्या

यावेळी आंदोलन करताना रुता आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी कोरोना आणि रुग्णांच्या उपचाराबाबत ठाणे मनपा गंभीर दिसत नसल्याचा आरोप केला. तसेच ऋता आव्हाड आणि मनपाचे विरोधी पक्षनेता शानू पठाण यांनी पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजन फलक आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन घोषणाबाजी केली.

ऋता आव्हाड यांना समजावण्याचा प्रयत्न

दरम्यान, ठाण्यातील कोरोनास्थितीवरुन ऋता आव्हाड आक्रमक झाल्यानंतर त्यांना तसेच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी जोरदार ठिय्या आंदोलन केल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज पालिकेची महासभा होती. याच दिवशी राष्ट्रवादी आणि मनसेने आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : इस्लामपुरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची अचानक कोरोना चाचणी, 8 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Video: धोक्याची चाहुल, ‘ज्युली’ खवळली, नागाचा मुडदा पाडला, लेकराचा जीव वाचवला, पाहा हा अफलातून व्हिडीओ

Lockdown: राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार

(wife of Jitendra Awhad Ruta Awhad protested in front of Thane Municipal office on shortage of Oxygen cylinder and Remdesivir for treatment of Corona patients)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI