Corona Cases and Lockdown News LIVE : ठाकरे सरकारकडून नगर जिल्ह्यावर अन्याय, खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 23:54 PM, 20 Apr 2021
Corona Cases and Lockdown News LIVE : ठाकरे सरकारकडून नगर जिल्ह्यावर अन्याय, खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप
maharashtra corona patients

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 20 Apr 2021 23:54 PM (IST)

  ठाकरे सरकारकडून नगर जिल्ह्यावर अन्याय, खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप

  अहमदनगरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. जिल्ह्याचे तीन मंत्री असूनही ठाकरे सरकारडून अहमदनगरवर अन्याय होत आहे, असा आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला.

 • 20 Apr 2021 23:25 PM (IST)

  चंद्रपुरात पुन्हा एका रुग्णाचा गाडीत मृत्यू, रुग्णालयापूढे स्वतःच्या गाडीतच जीव सोडला

  चंद्रपूर : चंद्रपुरात पुन्हा एका रूग्णाचा गाडीत मृत्यू, शासकीय कोविड रुग्णालयापूढे स्वतःच्या गाडीतच झाला मृत्यू, मनोहर डांगे (वय 51) चिमूर असे आहे मयताचे नाव, शासकीय/ खाजगी रुग्णालयात दिवसभर बेड्ससाठी फिरले नातेवाईक, अखेर शासकीय कोविड रुग्णालयापुढे प्रतीक्षेत लावली गाडी, बेड/ उपचार न मिळाल्याने झाला मृत्यू,अॅन्टीजेन चाचणी निगेटिव्ह, मात्र RTPCR अहवाल येण्यासाठी लागले होते 3 दिवस, थेट शासकीय कोविड रुग्णालयापुढे बाधितांचे लागोपाठ होणारे मृत्यू जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक चित्र पुढे करताहेत

 • 20 Apr 2021 21:53 PM (IST)

  राज्यात पुन्हा कोरानाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 519 रुग्णांचा मृत्यू, तर 62 हजार 97 नवे रुग्ण

  राज्यात पुन्हा कोराना उद्रेक, दिवसभरात तब्बल 519 रुग्णांचा मृत्यू, 62 हजार 97 नवे रुग्ण, तर गेल्या 24 तासात 54 हजार 224 रुग्ण बरे झाले आहेत.

 • 20 Apr 2021 21:50 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 75 रुग्णांचा मृत्यू, तर 5138 नव्या रुग्णांची नोंद

  पुणे शहर कोरोना अपडेट

  – दिवसभरात ५१३८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात ६८०२ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ७५ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील.
  – १२७७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३७६९६२.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५२९७७.
  – एकूण मृत्यू -६२१८.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३१७७६७.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०२०४.

 • 20 Apr 2021 21:48 PM (IST)

  इचलकरंजीत पोलिसांची मोठी कारवाई, संचारबंदीत दारुविक्री करणाऱ्यांना बेड्या

  इचलकरंजी : शहरातील उपवन बारा अँड परमिट रूमवर  डीवायएसपी पथकाची कारवाई, संचारबंदीच्या काळामध्ये बंद असताना चोरून दारूविक्री, पोलिसांनी दारूसह मोठा साठा जप्‍त, पोलिसांनी मालकासह कामगाराला घेतले ताब्यात, अश्विन शेट्टी, संजय शिंदे या दोघांना अटक, डिवाएसपी डी बी महामुनी यांच्या पथकाची कारवाई

 • 20 Apr 2021 19:24 PM (IST)

  राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची फार्मा कंपन्यांसोबत बैठक

  राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची फार्मा कंपन्यांसोबत बैठक, रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकांसोबत मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात बैठक सुरु होणार

 • 20 Apr 2021 19:22 PM (IST)

  चंद्रपुरात दिवसभरात तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू, 1425 नव्या रुग्णांची नोंद

  चंद्रपूर:

  गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहा:कार,  1425 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 16 मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 44869

  एकूण कोरोनामुक्त : 32024

  ऍक्टिव्ह रुग्ण : 12207

  एकूण मृत्यू : 638

  एकूण नमूने तपासणी : 337064

 • 20 Apr 2021 19:14 PM (IST)

  रूग्णसंख्या वाढली, ऑक्सिजन न मिळाल्यास हाहा:कार माजेल, त्यामुळं लॉकडाऊनचा निर्णय : अनिल परब

  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे :

  – वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही काम करण्याची मर्यादा संपत आलीय
  –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या जाहीर करणारी एसओपी अंतिम असेल
  – अजून रूग्णसंख्या वाढली, ऑक्सिजन न मिळाल्यास हाहा:कार माजेल, त्यामुळं लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय

  – कोरोना वाढत आहे. कडक निर्बंध लादूनही जनता रस्त्यावर येतंय. पूर्ण चर्चा झालीय व मुख्यमंत्री उद्या बोलतील
  – कसा लॉकडाऊन असेल हे सीएम सांगतील
  – वैद्यकीय सुविधा अपुरी पडतंय. संसर्ग टाळायचा असेल तर संपर्क कमी करायला हवा. त्यासाठी लॉकडाऊनसाठी कडक पाऊल उचलेल

  – लाल फितीच्या कारभारात न अडकता लोकांचे प्राण वाचविण्यासाठी लागणारे निर्णय अधिका-यांनी घ्यावेत.सरकार त्यांच्या पाठिशी राहिल.
  – रेमडेसिविर काळाबाजार करणा-यांवर कारवाई होणार

  – ऑक्सिजनच्या टंचाईवर लवकरच मात करू
  – शासनाच्या विविध विभागांमधील मालवाहतुकीमधील २५ टक्के मालवाहतूक ही एसटीकडे द्यावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. यामुळं एसटील तोट्यातून बाहेर काढण्यास मदत होईल.शासकीय वाहनांची दुरूस्तीही एसटीच करेल.

 • 20 Apr 2021 18:29 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 91 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 6890 नव्या रुग्णांची नोंद

  नागपूर जिल्ह्यात कोरोनाचं मृत्यूतांडव

  – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 91 कोरोनाबाधितांचा मृत्यू

  – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 6890 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  – 24 तासांत 5504 जण झाले कोरोनामुक्त

  – 24 तासांत 26080 जणांच्या कोरोना चाचण्या

   

 • 20 Apr 2021 18:27 PM (IST)

  वाशिममध्ये 2 रुग्णांचा मृत्यू तर एकाच दिवशी आढळले 386 नवे रुग्ण 

  वाशिम कोरोना अलर्ट

  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

  जिल्ह्यात आज 2 रुग्णांचा मृत्यू तर आज एकाच दिवशी आढळले 386 नवे रुग्ण

  दिवसभरात 416 जणांना डिस्चार्ज

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 20 दिवसात एकूण 51 रुग्णांचा झाला मृत्यू

  मागील 19 दिवसात आढळले एकूण 6974 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 23049

  सध्या सक्रिय रुग्ण – 4127

  आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 18683

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 238

 • 20 Apr 2021 18:23 PM (IST)

  वाशिममध्ये रिसोड तालुक्यातील गोवर्धनमध्ये 50 जण कोरोना पॉझिटिव्ह

  वाशिम : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून,मागील आठवड्यात ग्रामीण भागातही कोरोनाने कहर केला आहे. मागील पंधरा दिवसापासून गोवर्धन इथं कोरोनाचा कहर सुरूच आहे. रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे आज एका दिवसांत 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 500 लोकसंख्या असलेल्या गोवर्धन येथे आजपर्यंत 716 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

 • 20 Apr 2021 18:20 PM (IST)

  पिंपरी-चिंचवड मध्ये दिवसभरात 2563 नवे कोरोना रुग्ण

  पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

  आज नवे कोरोना रुग्ण -2563

  कोरोनामुक्त -2206

  एकूण मृत्यू -54

  एकूण कोरोना रुग्ण -188588

  एकूण कोरोनामुक्त -162870
  एकूण मृत्यू -2444

 • 20 Apr 2021 17:58 PM (IST)

  मोठी बातमी ! राज्यात काही तासांत संपूर्ण लॉकडाऊन

  गृनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड माध्यमांशी संवाद साधत आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लसीकरणारचा वेग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशामध्ये उत्पादित होत असलेल्या प्रत्येक लसीला महाराष्ट्रात आणण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारला केली जाणार आहे. भारतातील लसीचं उत्पादन मर्यादित आहे. महाराष्ट्रातील किमान 10 कोटी जनतेला लस द्यायची म्हटलं तरी देशातील लसी पुरणार नाहीत. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्या – जितेंद्र आव्हाड

  तासांत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन

  यावेळी तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेसुद्धा माध्यमांशी बोलत आहेत. राज्यात निर्बंध लागू केले तरी रुग्ण कमी होत नाहीयेत. त्यामुळे काही तासांत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा लागेल- अस्लम शेख

  कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे- एकनाथ शिंदे

  आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय.. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारुन हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रय़त्न सुरु आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील. राज्यात कोरोनाची चैन ब्रेक करायची असेल तर त्यासाठी कठोर निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही.

  आमची तर संपूर्ण लॉकाडाऊन लागू करण्याची मागणी आहे. कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.

  दहावीच्या परीक्षा रद्द- राजेश टोपे 

  सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊनचा आग्रह धऱला आहे. जे गोरगरीब लोक असतात. त्यांच्यावर ज्या अडचणी येतील त्यांच्यावर कसा अन्याय होणार नाही, त्यावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. आपल्याला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी ऑक्सिजन जनरेटर प्लांट लवकरात लवकर जनरेट करावा याची मागणी मंत्रिमंडळाने केली आहे. सर्वांत महत्त्वाचा विषय हा लसीचा आहे. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होणार आहे. यानंतर लसीकरण जोरदार पद्धतीने होणार.वाटल्यास बाकीच्या खर्चात कपात करु मात्र, लसीकरण युद्धपातळीवर करणार  आहोत, तसे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

  रेमडेसिव्हीर इंजेकश्नसाठी आज बैठक – राजेश टोपे

  आज सायंकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे सात रेमडेसिव्हीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्याच्या मालकांची बैठक बोलावली आहे. यामध्ये रेमडेसिव्हीरसाठी जोरदार मागणी केली जाणार आहे. या बैठकीला आम्ही अपस्थित असणार आहोत. आगामी काळात डिमांड सप्लायचा गॅप राहणार नाही, असा आम्हाला विश्वास आहगे.

   

 • 20 Apr 2021 17:46 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 924 नवे कोरोना रुग्ण

  गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

  आज वाढलेले रुग्ण – 924

  आज झालेले मृत्यू – 21

  आज बरे झालेले रुग्ण – 612

  तालुक्यानुसार रुग्णसंख्या

  गोंदिया————–461

  तिरोडा————–104

  गोरेगाव————–118

  आमगाव————– 32

  सालेकसा————- 32

  देवरी—————— 67

  सडक अर्जुनी ———– 19

  अर्जुनी मोरगाव——– 88

  इतर राज्य————–03

  एकूण रुग्ण – 27084

  एकूण मृत्यू – 387

  एकूण बरे झालेले – 19911

  एकूण उपचार घेत असलेले – 6786

 • 20 Apr 2021 17:11 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात आज 615 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  गडचिरोली :  जिल्हयात 615 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 287 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आतापर्यंत 15929 जण बाधित झाले आहेत. यापैकी 12242 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3447 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयात एकुण 240 जणांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

   

 • 20 Apr 2021 17:08 PM (IST)

  अहमदनगर जिल्ह्यात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा

  अहमदनगर : जिल्ह्यात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा

  ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उत्पादकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

  एमआयडीसीतील अहमदनगर इंडस्ट्रीज गॅस, हायटेक आणि श्रद्धा एअर प्रोडक्ट्स, संगमनेरमधील बालाजी एअर प्रोडक्ट्स आणि श्रीगोंद्यातील मनोज गॅस एजन्सीला जिल्हा प्रशासनाने बजावली नोटीस

  जिल्ह्याबाहेर ऑक्सिजन वितरित करण्यास केली मनाई

 • 20 Apr 2021 16:13 PM (IST)

  नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या, कोरोना संसर्ग वाढल्यामुळे निर्णय़

  नागपूर : कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा पुढे ढकलल्या

  – विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्णय

  – ॲानलाईन परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय

  – BCA, BSC, BARCH, BA, यासह इतर परीक्षा पुढे ढकलल्या

 • 20 Apr 2021 16:08 PM (IST)

  पुण्यात शेवाळेवाडीतील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, पेशंट्स हलवण्यासाठी डॉक्टरांची धावाधाव

  पुणे : शेवाळेवाडीतील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

  पेशंट्स हलवण्यासाठी डॉक्टरांची धावाधाव

  प्रशासनाकडून तुर्तास 7 सिलिंडर्सचा पुरवठा

  डॉक्टरांनी ऑक्सिजनचा स्टॉक लक्षात घेऊनच पेशंट्स भरती करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

 • 20 Apr 2021 16:06 PM (IST)

  बार्शीत 80 टक्के तालुक्याबाहेरील, सहकार्य करा अन्यथा रुग्णांना दाखल करून घेणार नाही- राजेंद्र राऊत

  सोलापूर –  बार्शीत 80 टक्के कोरोनाबाधित रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारच्या तालुक्यातील

  त्यामुळे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी ऑक्सिजन ,गोळ्यांचा साठा बार्शीसाठी द्यावा

  बार्शी तालुक्याबाहेरील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सहकार्य करा

  अन्यथा बार्शीत रुग्णांना दाखल करून घेणार नाही

  बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा

   

 • 20 Apr 2021 15:48 PM (IST)

  इस्लामपुरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची अचानक कोरोना चाचणी, 8 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

  सांगली- इस्लामपुरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची अचानक कोरोना चाचणी

  तब्बल 8 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

   

 • 20 Apr 2021 15:14 PM (IST)

  राहुल गांधी यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

  दिल्ली : काँग्रसेचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनासुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे.

  After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.

  All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.

  — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021

 • 20 Apr 2021 14:36 PM (IST)

  राज्य सरकारचा मोठा निर्णय, अत्यावश्यक सेवेची दुकानं फक्त चार तास सुरु राहणार

  राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. किराणा दुकानं, दूध, भाजीपाला दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने या दुकानांची वेळ कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या नियमानुसार आता अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान आणि इतर दुकानं हे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. राज्य सरकारकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

  किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, खासगी पेट्रोलपंप विक्री हे सकाळी सात ते अकरा याच वेळेत खुली राहतील. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, शिकवणी किंवा ट्यूशन पूर्णत: बंद राहतील.

 • 20 Apr 2021 13:47 PM (IST)

  पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड शनिवार आणि रविवार पुर्णतः राहणार बंद

  पुणे –

  पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड शनिवार आणि रविवार पुर्णतः राहणार बंद

  वाढत्या गर्दीमुळे प्रशासनानं घेतला निर्णय,

  मार्केट यार्डातील गाळे हे सोमवार ते शुक्रवार 50 टक्केच राहणार सुरू

  मार्केट यार्डात संचारबंदीच्या नियमाच पहिल्या दिवसापासून होतंय उल्लंघन

  शनिवारी आणि रविवारी भाजीपाला न घेऊन येण्याचं प्रशासनाचं आवाहन

 • 20 Apr 2021 12:48 PM (IST)

  नाशकात कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस आयुक्त पुन्हा मैदानात

  नाशिक –

  कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस आयुक्त पुन्हा मैदानात

  पोलिसांना दिली जाते आहे ‘सुर्यस्नान’ आणि ‘जलनेती’ ची थेरपी

  कोव्हिडं सेंटर मध्ये असलेले 90 पोलीस कर्मचारी ऑक्सिजन न लागताच ठणठणीत

  पोलीस आयुक्तांनी यापूर्वी देखील तयार केले होते कोरोना वर प्रभावी ‘ ग्रीन ज्यूस’

  पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा पोलीस कर्मचाऱयांना मोठा दिलासा

 • 20 Apr 2021 12:39 PM (IST)

  औरंगाबादच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमधील ऑक्सिजनची समस्या सुटली

  औरंगाबादच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमधील ऑक्सिजनची समस्या सुटली

  रुग्णांना शिफ्ट करण्याची नौबत टळली

  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन झाले उपलब्ध

  ऑक्सिजन साठा संपल्यामुळे रुग्ण शिफ्ट करण्याच्या नातेवाईकांना केल्या होत्या सूचना

  120 रुग्णांना शिफ्ट करण्याची आली होती वेळ

  रुग्णांचा नतेवाईकांची रात्रभर सुरू होती धावपळ

  अखेर ऑक्सिजन प्रॉब्लेम सुटल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने उपलब्ध करून दिले ऑक्सिजन सिलेंडर

 • 20 Apr 2021 11:36 AM (IST)

  मुंबईत बेकायदेशीर साठा केलेले 2200 रेमडेसीव्हीर इंजेक्शन पोलिसांकडून जप्त

  मुंबईत बेकायदेशीर साठा केलेले 2200 रेमडेसीव्हीर इंजेक्शन पोलिसांकडून जप्त

  मुंबई पोलीस आणि एफडीएची संयुक्त कारवाई

  अंधेरीतीळ मरोल आणि मरीन लाईन्स परिसरात छापा

  मरोळ परिसरातून रेमडिसिव्हरच्या 2000 व्हाईल्स जप्त करण्यात आल्यात तर मरीन लाईन्स परिसरातून 200 व्हाईल्स ताब्यात घेण्यात आल्यात

  सर्व व्हाईल्स एफडीएकडे सोपवण्यात आल्या असून त्या योग्य त्या ठिकाणी हॉस्पिटलला दिल्या जातील – मुंबई पोलीस

 • 20 Apr 2021 11:35 AM (IST)

  सातारा जिल्हयात 1571 जणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह

  सातारा जिल्हयात 1571 जणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह

  जिल्हयात 15042 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार

  जिल्हयात आतापर्यन्त 2155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ सुभाष चव्हाण यांची माहिती

 • 20 Apr 2021 11:34 AM (IST)

  नालासोपाऱ्यात नव्या नियमावली नुसार पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

  नालासोपार –

  नालासोपाऱ्यात नव्या नियमावली नुसार पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत .. सकाळी 11च्या नंतर मेडिकल दुकान सोडले तर सर्व सेवा बंद करण्याची नवी नियमावली आज पासून वसई विरार महापालिका ने सुरु केली आहे. त्या नियमावली ची अंमलबजावणी सुरु केली आहे. नालासोपारा पूर्व ब्रिज खालील सर्व दुकान बंद करून नागरिकांना हि हाकलून दिले आहे

 • 20 Apr 2021 10:49 AM (IST)

  पारनेर तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिला मृत कोरोनाबाधित आजोबांना मुखाग्नी

  अहमदनगर –

  पारनेर तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिला मृत कोरोनाबाधित आजोबांना मुखाग्नी

  तालुक्यातील किन्ही येथील गोमा यशवंत खोडदे या ७८ वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन

  एक मुलगा हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्यास येण्यासाठी वेळ नाही, प्रशासनाने केले अंत्यसंस्कार

  तहसीलदार देवरे यांनीच केले सर्व विधी

 • 20 Apr 2021 09:52 AM (IST)

  बनावट कोरोना RTPCR रिपोर्ट बनवून देणाऱ्या दोन ट्रॅव्हल एजंटला हिंजवडी पोलिसांकडून अटक

  पिंपरी चिंचवड

  -बनावट कोरोना RTPCR रिपोर्ट बनवून देणाऱ्या दोन ट्रॅव्हल एजंटला हिंजवडी पोलिसांकडून अटक

  -पुणे येथे येणारे आणि जाणारे प्रवाशी नागरिकांना देत होते खोटा चाचणी अहवाल

  -बावधन भागातील एका खाजगी लॅबचे बनावट लेटरहेड तसेच लॅब मधील डॉक्टर यांचा सही शिक्का करत देत होते बनावट कोरोना RTPCR रिपोर्ट

  -हे बनावट रिपोर्ट बनवून देणाऱ्या आणखी दोघांचा शोध सुरू

 • 20 Apr 2021 09:51 AM (IST)

  पुणे शहरातील मंडई चौकात पुणेकरांनी केली गर्दी

  पुणे –

  – शहरातल्या मंडई चौकात पुणेकरांनी केली गर्दी,

  – सकाळपासून भाजीपाला खरेदी करण्यासाठी पुणेकर मंडई गर्दी करतायत,

  – गर्दीमुळे सोशल डिस्टसींग पूर्णपणे फज्जा,

  – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना शहरातील गर्दी मात्र कमी होत नाहीय,

  – प्रशासनाच्या आवाहनाकडे पुणेकरांचे दुर्लक्ष

 • 20 Apr 2021 09:25 AM (IST)

  कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ICSE ची दहावीची परीक्षा रद्द

  कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ICSE ने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत, तर इयत्ता 12 वी च्या परीक्षा पूर्वी सांगितल्याप्रमाणे होतील

   

 • 20 Apr 2021 08:55 AM (IST)

  पुण्यातील एकाच कंपनीतील 161 कामगारांना कोरोना

  पुणे –

  पुण्यातील एकाच कंपनीतील 161 कामगारांना कोरोना

  बौर गावाच्या हद्दीत असलेल्या एका कंपनीमधील सुमारे १६१ कामगारांची

  करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

  मावळ तालुक्यातील पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेलगतच्या गावांतील अनेक कामगार येथे कामाला आहेत.

  यामुळे संबंधित गावांतही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 • 20 Apr 2021 08:51 AM (IST)

  पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये उद्यापासून आठवडाभर बंद

  सोलापूर –

  पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये उद्यापासून आठवडाभर बंद

  गाव बंद करण्याचा गावकऱ्यांनी घेतला निर्णय

  21 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत मेडिकल दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार

  जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची दुकानदारांकडून व्यवस्था

  वाढत्या कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी घेतला निर्णय

 • 20 Apr 2021 08:42 AM (IST)

  सोलापुरात ऑक्सिजन निर्मितीचे चार नवीन प्रकल्प सुरू होणार

  सोलापूर –

  ऑक्सिजन निर्मितीचे चार नवीन प्रकल्प सुरू होणार

  शहरात तीन ठिकाणी तर पंढरपूर एका ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे नियोजन

  चारही प्रकल्पातून सरासरी 320 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याचा प्रशासनाचा दावा

  रोज वैद्यकीय क्षेत्रासाठी 56 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज ,तर उत्पादकाकडून 36 मेट्रिकटन ऑक्सिजनचा पुरवठा

 • 20 Apr 2021 08:42 AM (IST)

  नाशकात रेमडिसिव्हर वितरणाचा घोळ सुरुच

  नाशिक –

  रेमडिसिव्हर वितरणाचा घोळ सुरुच

  मागणी 10 हजार इंजेक्शन ची..

  प्रत्यक्षात मिळाले 1530

  रेमडीसीव्हर वितरण कक्षाचा विस्तार,

  उपजिल्हाधिकारी श्रींगी यांच्याकडे आता विस्तारित कक्षाची जबाबदारी

 • 20 Apr 2021 08:41 AM (IST)

  नाशकात दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6845 रुग्णांची वाढ

  नाशिक –

  कोरोनाची धक्कादायक वाढ कायम

  जिल्ह्यात दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6845 रुग्णांनी झाली वाढ

  नवी उच्चांकी,बाधीत संख्या

  दिवसभरात 40 जणांचा मृत्यू

  बळींची संख्या 3 हजाराच्या उंबरठ्यावर

  बळींची संख्या झाली 2975

  नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

  दिवसभरात 3870 नवे बाधीत,21 बळी

 • 20 Apr 2021 08:03 AM (IST)

  औरंगाबाद शहरातील खाजगी रुग्णालयात कोरोना लसींचा तुटवडा

  औरंगाबाद –

  औरंगाबाद शहरातील खाजगी रुग्णालयात कोरोना लसींचा तुटवडा

  लसीच्या तुटवड्यामुळे पहिला डोस देणे झाले बंद

  खाजगी रुग्णालयात फक्त दुसरा डोस देणे सुरू

  ज्यांनी यापूर्वी लस घेतली फक्त त्यांनाच दुसरा डोस देणे सुरू

  नव्याने होणारे लसीकरण झाले पूर्णपणे बंद

  औरंगाबाद महापालिकेकडून लसींचा पुरवठा होत नसल्याची रुग्णालयाकडून माहिती

 • 20 Apr 2021 08:01 AM (IST)

  वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ग्रामीण भागात उभारणार आणखी पंधरा कोविड सेंटर

  कोल्हापूर

  वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ग्रामीण भागात उभारणार आणखी पंधरा कोविड सेंटर

  दीड हजार जादा बेड उपलब्ध होणार, यामध्ये 132 ऑक्सीजन तर 1458 नॉन ऑक्सिजन बेड चा समावेश

  नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले लोक पुन्हा परत येत असल्याचा पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

  गावी परतनाऱ्यांवर होणार आता गावातच उपचार

 • 20 Apr 2021 07:55 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यात सहा ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार

  रत्नागिरी –

  जिल्ह्यात सहा ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार

  जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ९० लाख रुपये मंजूर

  कामथे, कळंबणी, दापोली आणि राजापूर इथं देखिल आँक्सिजन प्लॅट उभारणार

  जिल्ह्यात २८ मेट्रोक टन आँक्सिजनचा साठा, दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा

 • 20 Apr 2021 07:54 AM (IST)

  नागपूर जिल्हयात दीड महिन्यात 85टक्के नवे कोरोनाबाधीत

  – नागपूर जिल्हयात दीड महिन्यात 85टक्के नवे कोरोनाबाधीत

  – जिल्ह्यात ८० टक्के कोरोना रुग्णांचे मृत्यू दीड महिन्यात

  – १ जानेवारी ते १५ एप्रिल या साडेतीन महिन्यात १ लाख ७५ हजार नवे रुग्ण

  – गेल्या दीड महिन्यात वाढले सर्वाधीक कोरोना रुग्ण

  – गेल्या दीड महिन्यात एकूण मृत्यूपैकी ८० टक्के कोरोनाबाधीतांचे मृत्यू

  – कोरोना रुग्ण वाढल्याने नागपूर जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर

 • 20 Apr 2021 07:51 AM (IST)

  मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपीचा नागपूरच्या कारागृहात कोरोनामुळे मृत्यू

  – मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपीचा नागपूरच्या कारागृहात कोरोनामुळे मृत्यू

  – कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी चा कोरोनामुळे मृत्यू

  – २००६ बॅाम्बस्फोटातील कमाल ला झाली होती फाशीची शिक्षा

  – नागपूर कारागृहात कमाल याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले होते

  – ९ एप्रिलला झाली कोरोनाची लागण, काल उपचारादरम्यान मृत्यू

  – धंतोली पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद

 • 20 Apr 2021 07:01 AM (IST)

  इटलीतील लॉकडाऊन संपणार, अमेरिकेत नव्या स्ट्रेनचं आव्हान

  इटलीतील लॉकडाऊन संपणार, अमेरिकेत नव्या स्ट्रेनचं आव्हान

  मृत्यूबाबत 7 व्या क्रमांकावरील इटलीतील परिस्थिती बदलतेय

  इटलीत कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे,

  २६ एप्रिलपासून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले

  परंतु त्यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन केले पाहिजे.

 • 20 Apr 2021 07:00 AM (IST)

  ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनास रस्ता दिला नाही तर, राज्यात नवा  नियम लागू

  मुंबई :

  आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी वाढत असून, ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे

  परिणामी विविध वाहनांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेला जात आहे

  मात्र, ऑक्सिजन वाहून नेताना त्या वाहनास टोलनाक्यांसह कुठेही अडविण्यात येऊ नये

  त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत

 • 20 Apr 2021 06:56 AM (IST)

  कोरोनाचा वाढती आकडेवारी आणि नागरिकांची वर्दळ, वसई-विरार महापालिकेकडून कडक निर्बंध

  कोरोनाचा वाढती आकडेवारी आणि नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने आज मध्यरात्री पासून कडक निर्बंध लावले आहेत

  उद्या सकाळपासून नवीन नियमावलीप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे दुकान, भाजीपाला मार्केट, दूध, चालू राहणार आहे

 • 20 Apr 2021 06:51 AM (IST)

  औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांना हलवण्याची दिली सूचना

  औरंगाबाद –

  औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांना हलवण्याची दिली सूचना

  मेडिकव्हर रुग्णालयाने पत्रक काढून नातेवाईकांना रुग्ण हलवण्याची केली सूचना

  ऑक्सिजन संपत असल्यामुळे रुग्ण हलवण्याची केली सूचना

  पत्रक निघताच रुग्णांच्या नातेवाईकात उडाली खळबळ

  ऑक्सिजन पुरवठा कधीही बंद होऊ शकतो त्यामुळे रुग्ण हलवण्याची दिली सूचना

  मेडिकव्हर रुग्णालयात शंभरच्या वर रुग्णांवर सुरू आहेत उपचार