Fashion Designer Prathyusha Garimella : टॉपची फॅशन डिझायनर प्रथ्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरीच आढळला मृतदेह

दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jun 11, 2022 | 9:08 PM

पोलिसांनी तिच्या बेडरूममधून कार्बन मोनॉक्साईड सिलिंडर जप्त केला आहे. तिच्या मृत्यूबाबत सध्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनाही तिच्या मृत्युचे ठोस कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Fashion Designer Prathyusha Garimella : टॉपची फॅशन डिझायनर प्रथ्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरीच आढळला मृतदेह
टॉपची फॅशन डिझायनर प्रथ्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू
Image Credit source: tv9

तेलंगणा : तेलंगणातून (Telangana Crime) एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. कारण टॉपची फॅशन डिझायनर प्रथ्युषा गरिमेला (Prathyusha Garimella) ही तेलंगणातील बंजारा हिल्स येथे तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. राहत्या घेरीत तिचा मृतदेह सापडल्याची (Fashion Designer Death) माहिती ही स्थानिक पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी तिच्या बेडरूममधून कार्बन मोनॉक्साईड सिलिंडर जप्त केला आहे. तिच्या मृत्यूबाबत सध्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनाही तिच्या मृत्युचे ठोस कारण अद्याप कळू शकलेलं नाही. प्रत्युषाने कार्बन मोनोऑक्साइडचे सेवन केल्याचा संशय आहे ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे. मात्र मृत्युमागचे ठोस कारण पोलिसांच्या तपासानंतरही बाहेर येऊ शकते.

एएनआयवृत्तसंस्थेचं ट्विट

डिप्रेशनमध्ये असल्याचेही मित्रांचे सांगणे

समोर आलेल्या रिपोर्टनुसार प्रत्युषाने बाथरूममध्ये कोळशाची वाफ घेतली होती, तेही एक मृत्यूचे कारण असू शकते. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. प्रत्युषाचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रत्युषा डिप्रेशनमधून जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात वेगवान हलचाली करत आहेत.

बॉलिवूडमध्येही अनेकांचे कपडे डिझाईन केले

प्रत्युषाने अमेरिकेतून फॅशन डिझायनिंग केले आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात हैदराबादमधून केली. 2013 मध्ये प्रत्युषाने स्वतःच्या नावाने लेबल सुरू केले, त्यानंतर तिच्या करिअरची गाडी ही सुसाट सुटली. प्रत्युषाने टॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींसाठी कपडे डिझाइन केले आहेत. याशिवाय प्रत्युषाने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठीही काम केले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक अल्पवयीन अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर्सनी आत्महत्या केल्या आहेत. प्रत्युषाच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देताना सर्कल इन्स्पेक्टरने एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइड सिलिंडर जप्त केला आहे. या प्रकरणात आता नेमकं काय घडलंय ते पोलीस तपास पूर्ण झाल्याशिवाय कळायला मार्ग नाही. मात्र सध्या तरी मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI