AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bus Accident : थरकाप उडवणारा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली

Bus Accident : थरकाप उडवणारा एक भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस आणि लोखंडी सळ्या असलेल्या कंटनेरचा अपघात झाला आहे. बसच्या आत अडकलेले प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते.

Bus Accident : थरकाप उडवणारा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली
Road Accident
| Updated on: Aug 26, 2026 | 7:59 AM
Share

तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील कोडड मंडळात द्वारकुंटाजवळ हैदराबादहून एलुरुला जाणाऱ्या खाजगी बसचा कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला आहे. कोडड मंडळातील द्वारकुंटाजवळ हा भीषण रस्ते अपघात झाला. लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनर ट्रकला एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने मागून धडक दिली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. कंटेनरमधील लोखंडी सळ्या बसमध्ये घुसल्याने अपघाताची भीषणता वाढली. खाजगी ट्रॅव्हल्सची बस हैदराबादहून एलुरुकडे जात होती. बसमध्ये अडकलेले प्रवासी विव्हळत होते. पोलिसांनी तासभर चाललेल्या बचावकार्यानंतर जखमी प्रवाशांना बाहेर काढले. हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी.

स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ही दुर्घटना कोडद मंडल द्वारकुंटा जवळ झाली. ही ट्रॅव्हल बस हैदराबादच्या दिशेने जात होती. बस कंटनेरला धडकताच आतमधील प्रवाशांचा किंकाळ्याचा एकच आवाज ऐकू आला. बसच्या आत अडकलेले प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी जखमींना बाहेर काढलं.

अपघाताच्यावेळी बसमध्ये किती प्रवासी होते?

अपघात झाला, त्यावेळी बसमध्ये 42 प्रवासी होते. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी कोडद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अपघातात गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अपघातानंतर हैदराबाद-विजयवाडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं हटवून वाहतूक पूर्ववत केली. पोलीस अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ