AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | ओडिशामध्ये सर्वात मोठा रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकली, हाहाकार…

ओडिशामध्ये खूप मोठा रेल्वे अपघात घडला आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

BIG BREAKING | ओडिशामध्ये सर्वात मोठा रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकली, हाहाकार...
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 02, 2023 | 10:07 PM
Share

बालासोर : ओडिशामध्ये खूप मोठा रेल्वे अपघात घडला आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या अपघातात रेल्वे गाडीचे अनेक डब्बे पलटी झाले आहेत. मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे. अपघात खूप मोठा आहे. कोरोमंडल एक्सप्रेसचे चार ते पाच डब्बे पलटी झाले आहेत. तर 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत.

कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. घटनास्थळी हाहाकार उडाला आहे. प्रचंड आक्रोशाचा आवाज येतोय.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरीक घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सिटी पोलीसही तिथे दाखल झाले आहेत. घटनास्थळी मोठी रेस्क्यू टीम दाखल होत आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर दाखल होत आहेत. घटना खूप मोठी आहे. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण याबाबत अधिकृत अशी माहिती समजू शकलेली नाही. बचाव पथकापुढे सध्याच्या घडीला मोठी आव्हानं आहेत.

बचाव पथकाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु

ही घटना नेमकी का घडली? मालगाडी नेमकी तिथे का उभी होती? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रकरणी योग्य तो तपास होणं गरजेचं आहे. पण आधी अपघातग्रस्त नागरिकांना वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. घटनास्थळी सध्या बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु झालं आहे. ही अशी घटना अनपेक्षित होती. पूर्व भारतातून दक्षणि भारताकडे जाण्यासाठी कोरोमंडल एक्सप्रेम महत्त्वाची मानली जाते. पण अशाच सुपरफास्ट एक्सप्रेसचा अशाप्रकारे अपघात झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून इमर्जन्सी कंट्रोल रुमचा 6782262286 हा फोन नंबर जारी करण्यात आला आहे. बाधितांनी मदतीसाठी या क्रमांकावर फोन करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, या रेल्वे अपघातावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया जारी करण्यात आलेली नाही. घटनास्थळी कलेक्टर दाखल झाले आहेत. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ही ट्रेन चेन्नई येथून सुटते. त्यानंतर ती ओडिशातून पश्चिम बंगालच्या हावडा येथे जाते.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?