AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरोगामी महाराष्ट्रातील मन हेलावणारी घटना, बहिणीची सख्ख्या भावाला लग्नाला न येण्याची विनवणी

महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. या महाराष्ट्रातील संतांनी, महापुरुषांनी समाजातील जाचक रुढी, पंरपरा यांना थारा दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी अशी ख्याती मिळाली. पण या पुरोगामी महाराष्ट्रात आजही काही अनपेक्षित घटना घडत आहे हे अहदनगर येथील घटनेमुळे स्पष्ट झालं आहे.

पुरोगामी महाराष्ट्रातील मन हेलावणारी घटना, बहिणीची सख्ख्या भावाला लग्नाला न येण्याची विनवणी
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9 marathi
Updated on: Jun 02, 2023 | 7:24 PM
Share

अहमदनगर : मामा आणि भाच्याचं नातं किती छान असतं. भाच्याच्या लग्नात मामाचा चांगलाच थाट असतो. कारण लग्न लागतं तेव्हा मंगालाष्टकवेळी मामा आंतरपाट पकडतो. याशिवाय इतर महत्त्वाच्या विधींच्या वेळी मामा तिथे असणं जास्त गरजेचं असतं. पण अहमदनगरमधील एका मामाला जातपंचायतीच्या जाचामुळे आपल्या भाच्याच्या लग्नाला जाता आलेलं नाही. विशेष म्हणजे या मामा त्याच्या सख्ख्या बहिणीने आपल्या मुलाच्या लग्नाला हजर न राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे या प्रकरणाची अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. विवाह सोहळा आयुष्यात वारंवार होत नाही. प्रत्येकाचा एकदाच विवाह पार पडतो. अशा कार्यक्रमाला सख्ख्या मामाने न येणं किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीने जातपंचायतीच्या जाचामुळे न येणं ही दुर्देवी असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कुटुंबाला (वैदू) जातपंचायतने वाळीत टाकल्याने भाच्याच्या लग्नाला मामाला जाता आले नाही. जातपंचायतच्या दहशतीमुळे बहिणीने भावाला दुखःद अंतकरणाने चिठ्ठी लिहून लग्नाला येवू नये, असं आवाहन केलंय. त्यामुळे जातपंचायतचा जाच अजूनही कसा सुरू आहे हे यावरून स्पष्ट होतंय. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे वैदू समाजातील सुशिक्षित डॉ. चंदन लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ठ परंपरा विरोधात लढा देत आहेत. त्यामुळेच की काय जातपंचायतच्या पंचानी त्यांच्या कुटुंबावरच अघोषित बहिष्कार टाकलाय.

बहिणीचं भावाला पत्र

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चंदन लोखंडे यांच्या कुटुंबियांना कोणीही सुख-दुखःच्या वेळी बोलावत नाही. तसेच त्यांच्याकडेही कोण जात-येत नाहीय. चंदन लोखंडे यांच्या भाच्याचा 30 मे ला विवाह पार पडला. मात्र बहिणीने मुलाकरवी अगोदरच पत्र लिहून भावाला लग्नाला न येण्याचं आवाहन केलं. कारण जर लग्नाला हे लोक गेले तर लग्न मोडेल आणि 12 लाख रूपये दंडही द्यावा लागला असता.

जातपंचायतीने अघोषित बहिष्कार टाकल्याने कुटुंबातील मुलांची लग्न जमवणे कठीण झालंय. डॉ. चंदन लोखंडे सामाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरा विरोधात लढा देत असल्याने आमच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्यात आला आहे. आम्ही प्रचंड दहशतीखाली जगत असल्याचे लोखंडे कुटुंबीय सांगताय.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

पाच सात वर्षांपूर्वी जातपंचायती बंद झालेल्या असतानाही अघोषितपणे त्या आजही अस्तित्वात असल्याचे लोखंडे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलंय. वैदू समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी देखील या घटनेचा निषेध केलाय. त्यांनी दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे आज जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना काही समाज अजूनही आपल्या अनिष्ठ परंपरा सोडताना दिसत नाहीय. अशा समाजांनी रूढी, परंपरांना तिलांजली देण्याची आणि अघोषित जातपंचायती हद्दपार करण्याची गरज आहे.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.