Big News Toll :टोलधाड ! राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताय? 10 रुपयांपासून ते 65 रुपयांपर्यंत टोल वाढला

Big News Toll :टोलधाड ! राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताय? 10 रुपयांपासून ते 65 रुपयांपर्यंत टोल वाढला
आज रात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार
Image Credit source: TV9

गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 31, 2022 | 11:37 AM

मुंबई – आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील (national highway) प्रवास महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपये, तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून महामार्गावरून प्रवास करत असताना तुम्हाला अधिक टोल भरावा लागणार आहे. राय काले ते काशी टोल प्लाझापर्यंत एक्स्प्रेस वेवर कार आणि जीपसारख्या हलक्या मोटार वाहनांसाठी 140 रुपयांऐवजी 155 रुपये टोल टॅक्स (toll tax) असेल. सराय काळे खान ते रसूलपूर सिक्रोड प्लाझा पर्यंतचे नवीन दर १०० रुपये आणि भोजपूरला जाण्यासाठी १३० रुपये असतील. विविध प्रकारच्या वाहनांसाठी 10-15% पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

high

टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ

छोट्या खाजगी वाहनांना 105 रुपये मोजावे लागणार आहेत

सध्या 6 राष्ट्रीय महामार्ग लखनौला जोडतात. यापैकी एकाही महामार्गावर टोल लागू नाही. त्याचबरोबर सीतापूर महामार्गावरील टोल दरात ऑक्टोबरपासून बदल होणार आहे.  पण कानपूर, अयोध्या, रायबरेली आणि सुलतानपूरला जाण्यासाठी टोल टॅक्स जास्त भरावा लागणार आहे. आज रात्रीपासून नवे दर लागू होतील. लखनौ-रायबरेली महामार्गावर (दखिना शेखपूर प्लाझा) आता छोट्या खाजगी वाहनांना 105 रुपये मोजावे लागणार आहेत, तर बस-ट्रकच्या दोन एक्सलसाठी 360 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे, लखनौ-अयोध्या महामार्गावर (नवाबगंज प्लाझा) आता छोट्या खाजगी वाहनासाठी 110 रुपये मोजावे लागणार आहेत. तर बस-ट्रकच्या दोन एक्सलसाठी 365 रुपये मोजावे लागणार आहेत.

बस-ट्रकच्या दोन एक्सलसाठी 295 रुपये मोजावे लागतील

लखनौ-कानपूर महामार्गावर (नवाबगंज प्लाझा) आता छोट्या खासगी वाहनासाठी 90 रुपये मोजावे लागतील, तर बस-ट्रकच्या दोन एक्सलसाठी 295 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे लखनौ-सुलतानपूर महामार्गावर (बारा प्लाझा) आता छोट्या खासगी वाहनाला 95 रुपये, तर बस-ट्रकच्या दोन एक्सलसाठी 325 रुपये मोजावे लागणार आहेत.

Bank Holidays in April 2022 : तुमची बँकांची कामे उरकून घ्या! एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या, वाचा यादी

Latur : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम, लातूरच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिले आश्वासन?

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें