महाराष्ट्रानंतर बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप, ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, थेट उजवा हातच..

तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्याने चक्क धक्का दिला. ममता बॅनर्जी यांना थेट पत्र दिले. महाराष्ट्रानंतर बंगालमध्ये राजकीय भूकंप पुन्हा आल्याचे दिसतंय.

महाराष्ट्रानंतर बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप, ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, थेट उजवा हातच..
Mamata Banerjee
| Updated on: Jul 04, 2026 | 2:15 PM

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामध्येच त्यांच्या पक्षातील बडे नेते पक्षाची साथ सोडून जात आहेत. ममता बॅनर्जी यांना एका मागून एक मोठे धक्के बसत आहेत. पक्षात मोठी फुट पडली. यादरम्यानच आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला अत्यंत मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. थेट ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी मोठा धक्का दिला. त्यांनी थेट पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या शुमार चंद्रिमा यांनी अचानकपणे राजीनामा दिला होता. त्यांच्या अशाप्रकारे जाण्याने टीएमसीला मोठा झटका मानला जात होता. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठी घर घर लागली.

अनेक निष्ठावंत पक्षाची साथ सोडून जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्य यांनी ममता बॅनर्जी यांमा एक पत्र लिहिले आणि याच पत्रकात त्यांनी याबाबतची माहिती दिली. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, त्या संघटनात्मक पदापासून मुक्त होत आहेत. मुळात म्हणजे चंद्रिमा भट्टाचार्य या तृणमूल काँग्रेसचा महत्वाचा चेहरा मानल्या जातात.

सरकारपासून ते संघटनात्मक गोष्टीत त्यांची पकड मजबूत आहे. चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या निर्णयानंतर मोठी खळबळ उडाली. चंद्रिमा यांनी घेतलेल्या निर्णयावर तृणमूल काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारचे यावर भाष्य करण्यात आले नाही. मात्र, बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली. अनेक महत्वाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली.

एका मागून एक धक्के ममता बॅनर्जी यांना बसत आहेत. मात्र, यादरम्यानच अत्यंत जवळच्या व्यक्तीने असा निर्णय घेतल्याने तृणमूल काँग्रेसच्या अडचणीत भर पडलीये. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातून लोक जात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचीही तब्बल 6 खासदारांनी साथ सोडली. या 6 खासदारांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामध्येच आता पश्चिम बंगालच्याही राजकारणात मोठा भूकंप आला. राजकीय घडामोडींना वेग आलाय.

Follow Us