टीव्ही डिबेटमधून सर्वाधिक प्रदूषण, प्रत्येकजण आपला अजेंडा राबवतोय; सरन्यायाधीशांनी दाखवला आरसा

| Updated on: Nov 17, 2021 | 7:30 PM

दिल्लीच्या प्रदूषणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी माध्यमांना आरसा दाखवला आहे. टीव्हीच्या डिबेटमधून सर्वाधिक प्रदूषण फैलावलं जात आहे.

टीव्ही डिबेटमधून सर्वाधिक प्रदूषण, प्रत्येकजण आपला अजेंडा राबवतोय; सरन्यायाधीशांनी दाखवला आरसा
CJI NV Ramana
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीच्या प्रदूषणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी माध्यमांना आरसा दाखवला आहे. टीव्हीच्या डिबेटमधून सर्वाधिक प्रदूषण फैलावलं जात आहे. प्रत्येकाचा आपला अजेंडा असून ते आपला अजेंडा राबवत आहेत, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाला आरसा दाखवला आहे.

शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर धसकटं जाळली जात आहेत. त्यामुळे दिल्लीत हवेचं प्रदूषण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांनी किती प्रमाणात धसकटं जाळली पाहिजे यावरून वाद सुरू आहे. या प्रकरणावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी हे विधान केलं आहे. टीव्हीवर होणाऱ्या डिबेटमधून दुसऱ्यांपेक्षा अधिक प्रदूषण फैलावलं जात आहे. त्यांना काही कळत नाही. ते संदर्भ सोडून विधानं करत असतात. प्रत्येकाचा स्वत:चा अजेंडा असतो, असं एनव्ही रमण्णा यांनी सांगितलं.

सॉलिसिटर तुषार मेहता यांनी मीडियाने चालवलेल्या बातमीकडे कोर्टाचे लक्ष वेधले होते. धसकटं जाळल्यामुळे हवेचं प्रदूषण वाढल्याचं विधान केलं होतं. मात्र मीडियाने हे विधान चुकीच्या पद्धतीने चालवलं. त्यामुळे माझ्याबाबत चुकीच्या प्रतिक्रिया उमटल्या असं तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं.

चुकीच्या बातम्या चालवल्या

माझ्या विरोधात टीव्हीवरून बेछूट आरोप लावण्यात आले. मी धसकटं जाळण्याच्या मुद्द्यावरून कोर्टाची दिशाभूल केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला. हे निखालस खोटे आरोप आहेत. हे मला इथे आवर्जुन सांगायचं आहे, असं मेहता यांनी स्पष्ट केलं. त्यावर जस्टीस डीवाय चंद्रचूड यांनी तुम्ही कोर्टाची दिशाभूल केलेली नाही, असं स्पष्ट केलं.

सार्वजनिक पदावर असता तेव्हा टीका होणारच

त्यादिवशी मी 4 टक्के धसकटं जाळण्यात आल्याचं सांगितलं. त्यावर विकास सिंह यांनी हा आकडा 35 टक्के असल्याचं सांगितलं. आमची बिलकूल दिशाभूल करण्यात आलेली नाही, असं चंद्रचूड यांनी सांगितलं. जेव्हा तुम्ही सार्वजनिक पदावर असता त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या टीकांना सामोरे जावंच लागतं हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, असं रमण्णा यांनी मेहता यांना सांगितलं.

शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही

दरम्यान, यावेळी कोर्टाने नोकरशहांना फटकार लगावली. आम्हाला शेतकऱ्यांना दंड ठोठवायचा नाही आणि त्यांना त्रासही द्यायचा नाही. सरकारने याबाबत मते मांडली पाहिजे. टीव्हीच्या डिबेटमधून यातून मार्ग निघणार नाही. तुम्ही निर्णय काय घेतला हे सांगा, अशी कोर्टाने विचारणा केली.

फाईव्ह स्टार हॉटेलात बसून मार्ग निघणार नाही

शेतकऱ्यांना धसकटं, कडबा का जाळावा लागतो? फाईव्ह स्टार हॉटेलात बसून यावर पर्याय निघणार नाही. शेतकऱ्यांना दोष देणं सोपं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना मशीन देऊ शकता. कानपूर आयआयटीने जो रिपोर्ट दिला आहे त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या:

कौटुंबिक वादामुळे पारा चढला, शेवटी डॉक्टरने भावावरच केला गोळीबार, गुन्हा दाखल, अहमदनगर हादरलं !

Kulbhushan Jadhav: अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर

दोन वर्षानंतर भाजपने विरोधी पक्ष म्हणून कामास सुरुवात केली ही चांगली गोष्ट; जयंत पाटलांचा खोचक टोला