AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवस वर्क फ्रॉम होम,ऑनलाईन मिटींग आणि नो व्हीईकल डे, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेलंगणा येथील सभेत देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले होते. आता देशाच्या राजधानीने या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

दोन दिवस वर्क फ्रॉम होम,ऑनलाईन मिटींग आणि नो व्हीईकल डे, मुख्यमंत्र्यांचे आदेश
work from home
| Updated on: May 15, 2026 | 3:10 PM
Share

इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल- डिझेलची बचत करण्याचे आवाहन केले आहे. या मालिकेत आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारने ‘मेरा भारत, मेरा योगदान’ या मोहिमे अंतर्गत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहे. खाजगी संस्थांना देखील हे आवाहन केले आहे. इंधन बचत, प्रदुषण नियंत्रण आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावर त्यांनी जोर दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी १५ मे पासून सुरु होणाऱ्या या मोहिमेला जनतेने सहकार्य करण्याचे अपिल केले आहे. चला पाहूयात रेखा गुप्ता यांच्या सरकारने कोणते निर्णय घेतले.

दिल्ली सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक महत्वाचे निर्णय आज घेतले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय हा वर्क फ्रॉम होम संदर्भात आहे. त्यानुसार सरकारी कर्मचारी घरातूनच काम करणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना हा निर्णय बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी संस्थांना देखील दोन दिवसांचा वर्क फ्रॉम हो करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आम्ही काही योजना आखल्या आहेत. दिल्ली सरकार ‘मेरा भारत, मेरा योगदान’ या मोहिमे राबवणार आहे.

 कोर्टाला देखील विनंती

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व विद्यापीठे आणि कॉलेजना देखील या संदर्भात अपिल केले आहे. तसेच कोर्टानाही विनंती केली आहे त्यांनी ऑनलाईन सुनावणी घ्यावी. जनतेला देखील आवाहन करताना त्यांनी एक वर्षे परदेश प्रवास टाळावा असे म्हटले आहे. दिल्ली सरकारचा कोणताही मंत्री आणि अधिकारी परदेश प्रवास करणार नाही असेही त्यांनी सांगितले. जे पूर्व घोषीत अधिकृत कार्यक्रम आहेत त्यांना रद्द करण्यात आले आहे. तसेच दिल्ली सरकार कोणताही मोठा इव्हेंट किंवा कार्यक्रम करणार नाही असेही त्यांनी सांगितले.

दिल्ली मॉल्समध्ये मेड इन इंडिया प्रोडक्टचा खास कॉर्नर स्थापन केला गेला आहे. दिल्ली सरकार १०० टक्के इंडिया मेड उत्पादनांना प्राधान्य देणार आहे. दिल्ली सरकार पुढील ९० दिवस ही मोहिम चालवणार आहे. वेगवेगळ्या संस्थांना इंधन वाचवणे आणि गैरजरुरी सामनांची खरेदी, परदेश दौरा, खाद्य तेल आणि मेड इन इंडिया प्रोडक्ट संदर्भात शपथ दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 ५० टक्के बैठका ऑनलाईन

सर्व व्यापाऱ्यांनी मालवाहतूकीसाठी ट्रक ऐवजी रेल्वेचा वापर करावा, २९ कॉलनींमध्ये ५८ फिडर बसेस चालवल्या जातील.त्यामुळे मेट्रोचा प्रवास सोपा होणार आहे. दिल्ली सरकारच्या ५० टक्के बैठका ऑनलाईन होतील. दिल्ली सरकारची कार्यालये सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालतील आणि दिल्ली महानगर पालिकेत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामे चालतील असेही मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटले आहे.

जनतेला ‘नो व्हीईकल डे’ साजरा करण्याचे आवाहन

जनतेने ‘नो व्हीईकल डे’ साजरा करावा असेही आवाहन करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जर २५ टक्के पब्लिक ट्रान्सपोर्टवर खर्च केले तर त्यांच्या ट्रान्सपोर्ट अलाऊन्सना १० टक्के वाढवण्यात येणार आहे. रेखा गुप्ता यांनी त्यांच्या ताफ्यातील कार कमी केल्या आहेत. आधी १३ ते १४ कार होत्या आणि त्यांची संख्या ४ वर आणली आहे. अधिकाऱ्यांच्या इंधनांच्या मर्यादेत २० टक्के कपात केली आहे.

दर सोमवार हा मेट्रो मंडे साजरा केला जाणार आहे. यादिवशी मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व अधिकारी मेट्रोचा वापर करतील. आमची ईव्ही पॉलीस तयार आहे. वीज वापरा संदर्भात दिल्ली सरकारचा फोकस आहे. सर्व कार्यालयातील एसी २४ ते २६ डिग्रीवर सेट केले जातील. विनाकारण दिवे पेटू नयेत यासाठी स्मार्ट बटणे असतील आणि १५ मे पासून ही “मेरा भारत, मेरा योगदान” मोहिम सुरु होणार आहे.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच...

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला.

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर.

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश.

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार.

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार