१२ तासांत रेल्वेचे दोन अपघात, सकाळी आसामात आणि सायंकाळी युपीच्या कानपूरात एक्सप्रेस घसरली

देशात गेल्या १२ तासांतील हा दुसरा रेल्वे अपघात घडला आहे. सकाळी कोलकाताहून मिझोरममधील सैरांगकडे जाणारी ट्रेन गुवाहाटीजवळच्या दिगारू रेल्वे स्थानकाजवळ घसरली. दरम्यान, संध्याकाळी कानपूरमध्ये चौरीचौरा एक्सप्रेस रुळावरून घसरली.

१२ तासांत रेल्वेचे दोन अपघात, सकाळी आसामात आणि सायंकाळी युपीच्या कानपूरात एक्सप्रेस घसरली
Chauri Chaura Express derails in Kanpur
| Updated on: Nov 11, 2026 | 9:30 PM

देशात १२ तासात दोन रेल्वे अपघात झाले आहे. बुधवार सकाळी आसामच्या गुवाहाटीजवळ कोलकाता-सैरांग एक्सप्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळांवरुन घसरल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.  त्यानंतर सायंकाळी उत्तर प्रदेशातील कानपूरात चौरीचौरा एक्सप्रेस घसरल्याची घटना समोर आली आहे, सुदैवाने दुसऱ्या अपघातात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.  १२ तासात दोन रेल्वे घसरल्याच्या घटना घडल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

देशात गेल्या १२ तासांतील हा दुसरा रेल्वे अपघात घडला आहे. बुधवारी सकाळी कोलकाताहून मिझोरममधील सैरांगकडे जाणाऱ्या ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे आसाममधील गुवाहाटीजवळच्या दिगारू रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरले होते. दरम्यान, आज संध्याकाळी कानपूरमध्ये चौरीचौरा एक्सप्रेसचे डबे घसरल्याची घटना घडली आहे.

Loading...

कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकात बुधवारी सायंकाळी चौरीचौरा एक्सप्रेसचे तीन एसी थर्ड डबे रुळांवरुन खाली उतरले. हा अपघात ट्रेन फलाट क्रमांक सात वरुन गोरखपूरसाठी रवाना होत होती तेव्हा घडला. नशीब यावेळी ट्रेनचा वेग कमी होता अन्यथा मोठा अपघात घडला असता. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

प्रवाशांमध्ये हाहाकार

चौरीचौरा एक्सप्रेस (15003) अनवरगंजहून सायंकाळी सुमारे 5:05 वाजताच्या सुमारास कानपुर सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर पोहचली होती. येथे दहा मिनिटे थांबल्यानंतर ट्रेन गोरखपूरसाछी रवाना होणार इतक्यात अचानक ट्रेनचे एसी थर्डचे तीन डबे बी-4, बी-5 आणि बी-6 रुळांवरुन उतरले. अचानक झटका बसल्याने ट्रेनमध्ये चढलेल्या प्रवाशांनी घाबरुन आरडा ओरड सुरु केली. काही कळायच्या आतच फलाटावर अफरातफरी माजली. प्रवासी आणि त्यांना सोडायला आलेले नातेवाईक यांच्यात एकच घबराट पसरली.

आसाममध्ये ट्रेन घसरल्याने चार जखमी

बुधवारी सकाळी आसाममधील गुवाहाटीजवळ दिगारू येथे सैरंग-कोलकाता एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने चार जण किरकोळ जखमी झाले. या ट्रेनचे पाच डबे आणि इंजिन रुळांवरुन घसरल्याने चार जण जखमी झाले. या ट्रेनमध्ये ३०० हून अधिक प्रवासी होते.दुसऱ्या ट्रेनला मार्ग देण्यासाठी एक्सप्रेस ट्रेन दिगारू स्टेशनवर थांबवली जात होती, परंतु लोको पायलटला वेग नियंत्रित करता आला नाही असे नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान,सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, लोको पायलट इंजिनमध्ये बसवलेली उपकरणे चालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की, यापैकी कोणतेही उपकरण काम करत नव्हते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us