AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्ष फुटीसाठी कोणी पुरवली रसद? फडणवीसांचं नाव घेत सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा, केस फिरणार?

Supreme Court Hearing Fadnavis : शिवसेना हा ठाकरेंचाच पक्ष असल्याचा युक्तीवाद ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. आज सहाव्या दिवशी शिवसेना कुणाची यावर उद्धव सेनेचा युक्तीवाद सुरू आहे. आता विधीज्ञ देवदत्त कामत हे युक्तीवाद करतील. आजच्या सुनावणीत पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्यात आले आहे.

पक्ष फुटीसाठी कोणी पुरवली रसद? फडणवीसांचं नाव घेत सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा, केस फिरणार?
शिवसेना, सर्वोच्च न्यायालय, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 3:42 PM
Share

शिवसेनेचा 7/12 कुणाच्या नावे आहे यावरून सुप्रीम युक्तीवाद सुरू आहे. उद्धव सेनेकडून गेल्या सहा दिवसातील सुनावणीत धरदार युक्तीवाद करण्यात आला. राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्ष, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली. उद्धव सेनेला पक्षपातीपणाची वागणूक मिळाल्याचा युक्तीवाद सुनावणीदरम्यान करण्यात आली. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सहाव्या दिवशीचा युक्तीवाद आज संपवला. तर त्यानंतर विधीज्ञ देवदत्त कामत हे ठाकरे सेनेकडून युक्तीवाद करत आहेत. दरम्यान आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फुटीत काय भूमिका वठवली आणि भाजपने कोणती रसद पुरवली याचा ऊहापोह सिब्बल यांनी केला.

23 जूनच्या ठरावावर भाष्य

23 जूनच्या ठरावावर सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. या ठरावानुसारच शिंदेंना पक्ष देण्यात आल्याचा आरोप केला. यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतली. सुनील प्रभू यांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर होते. त्यांना विचारणा केल्यावर तुमचा व्हीप आम्हाला लागू होत नाही असे फुटीर आमदारांनी सांगितल्याची बाजू मांडण्यात आली. सत्तेतील पक्षाने विरोधी पक्षासोबत सत्ता बनावण्यासारखा हा प्रकार असल्याची बाजू सिब्बल यांनी मांडली. त्यांनी युक्तीवाद करताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर पहिल्यांदाच भाष्य केले.

फडणवीसांची भूमिका काय?

विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर बोट ठेवतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितली असा मोठा दावा सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान मांडला. विश्वासदर्शक ठरावावरही त्यांनी मोठे भाष्य केले. विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केल्याचं ते म्हणाले. विधीमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता निवडलं, वास्तविक हा अधिकार राजकीय पक्षाचा असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. या सुनावणीत पहिल्यांदाच भाजपकडे बोट करण्यात आले आहे.

पक्षफुटीसाठी कुणी रसद पुरवली?

आमदार अगोदर सुरत येथे पोहचले, नंतर ते गुवाहाटीला थांबले. त्यानंतर ते गोव्यात दाखल झाले. ही कडी जुळवत पक्षफुटीसाठी कुणी रसद पुरवली याकडे सिब्बल यांनी थेट भाजपकडे बोट वळवले. या तीनही राज्यात भाजपची सत्ता होती याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले, त्या भाजपशासित राज्यात होत्या, हे त्यांनी स्पष्ट केले. तर गुवाहाटीला कोण कसं गेलं यावर आता बोलायचं नाही या महत्त्वाच्या मुद्दाला स्पर्श न करता त्यांनी रेटला. फुटीला प्रोत्साहन देण्यासाठी 10 व्या परिशिष्टाचा गैरवापर होऊ न देण्याचे आवाहनही सिब्बल यांनी केले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात