AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पीडित कुटुंबीयांच्या विनंतीवरून सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?
उज्ज्वल निकम, केतन अग्रवाल, सिया गोयलImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2026 | 12:27 PM
Share

पुण्यातील अत्यंत वादग्रस्त केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची एण्ट्री झाली आहे. निकम हे देशातील अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनीच अजमल कसाबला फाशी मिळवून दिली होती. आता केतन अग्रवाल प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने या तपासाला मोठं वळण प्राप्त झालं आहे. उज्ज्वल निकम यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी त्यांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं. यावर निकम म्हणाले, “या घृणास्पद हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे आणि याच भावनेनं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, होय मी नक्कीच या प्रकरणाची चौकशी करेन. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच प्रकरणाची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल.”

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याजवळ दरीत पडून 26 वर्षीय केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा एक अपघात मानला गेला, परंतु नंतरच्या तपासात हा एक पूर्वनियोजित खून असल्याचे पुरावे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा कथित साथीदार चेतन यांना अटक केली आहे.

उज्ज्वल निकम यांची फी किती?

मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वल निकम प्रत्येक सुनावणीसाठी अंदाजे 40 हजार रुपये फी आकारतात. करारानुसार नियुक्ती झाल्यावर निकम यांना त्यांच्या न्यायालयीन उपस्थितीसाठी 40 हजार रुपये दिले जातात. यामध्ये व्यावसायिक सल्ला शुल्क आणि खटल्याशी संबंधित इतर खर्चांचाही समावेश असतो. वरिष्ठ सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी अनेक मोठ्या आणि संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

उज्ज्वल निकम यांनी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रदीर्घ लढा दिला होता. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मधील मुंबई हल्ला, 2013 मधील मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2026 च्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातही विशेष सरकारी वकील होते. निकम यांना भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.

वाढदिवस साजरा करण्याची बतावणी करून सिया गोयलने 18 जून रोजी केतनला लोहगडावर नेऊन प्रियकराच्या मदतीने ढकलून दिलं होतं. सकाळी दहा ते पावणेअकराच्या सुमारास लोहगडावरील हत्ती तलावाच्या बाजूला असलेल्या दरीत सिया आणि चेतनने केतनला ढकलून दिलं. त्यानंतर केतन तोल जाऊन पडल्याचा कांगावा सियाने केला. केतनच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या अकस्मात मृत्यूबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. त्यानंतर सियाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चौकशीदरम्यान तिने प्रियकराच्या मदतीने केतनला कड्यावरून ढकलून देऊन खून केल्याची कबुली दिली.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत