मोठी बातमी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली, बारावी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?

| Updated on: Jun 01, 2021 | 1:06 PM

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडल्यानं बारावी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. Ramesh Pokhariyal Admitted to AIIMS Delhi

मोठी बातमी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली, बारावी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?
रमेश पोखरियाल निशंक
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhariyal Nishank) यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रमेश पोखरियाल यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. शिक्षणमंत्र्यांची प्रकृती बिघडल्यामुळे बारावी परीक्षांसदर्भात होणारी घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना बरा झाल्यानंतर होणार्या समस्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Union Education Minister Ramesh Pokhariyal Nishank admitted to AIIMS hospital in Delhi due to post covid problems)

रमेश पोखरियाल यांना 21 एप्रिला कोरोनाची लागण

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना 21 एप्रिला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर ते कोरोनातून बरे देखील झाले होते.मात्र, पोस्ट कोविड समस्यांमुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बारावी परीक्षा संदर्भातील निर्णय लांबणीवर

कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांसदर्भात रमेश पोखरियाल निशंक आज निर्णय जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, रुग्णालायत दाखल केल्यामुळे बारावी परीक्षेसंदर्भात काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे.

सीबीएसई जुलै महिन्यात परीक्षा घेणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीएसई 24 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान परीक्षांचं आयोजन करु शकते.

मुख्य विषयांचीच परीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते. यामुळे बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यास देखील मदत होऊ शकणार आहे. सीबीएसई कडून बारावीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण 176 विषय निश्चित केलेले असतात. या विषयांपैकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी विषय निवडायचे असतात. त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप एल असे दोन भाग केलेले असतात. ग्रुप ए मधील विषय हे महत्त्वाचे मानले जातात. त्या आधारेच विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ग्रुप ए मध्ये 20 विषय असतात. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांची तीन मुख्य विषयांची परीक्षा घेतली जाईल. याआधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा रद्द मात्र पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार? MSEC चा नेमका निर्णय काय?

CBSE Board 12th Exam: बारावीच्या परीक्षा 24 जुलैपासून?, शिक्षण मंत्रालयाचे 3 प्रस्ताव, PMO च्या मंजुरीची प्रतीक्षा

(Union Education Minister Ramesh Pokhariyal Nishank admitted to AIIMS hospital in Delhi due to post covid problems)