CBSE Board 12th Exam: बारावीच्या परीक्षा 24 जुलैपासून?, शिक्षण मंत्रालयाचे 3 प्रस्ताव, PMO च्या मंजुरीची प्रतीक्षा

CBSE Board 12th Exam: बारावीच्या परीक्षा 24 जुलैपासून?, शिक्षण मंत्रालयाचे 3 प्रस्ताव, PMO च्या मंजुरीची प्रतीक्षा
परीक्षा फाईल फोटो

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता आहे. CBSE board class 12th exam

Yuvraj Jadhav

|

Jun 01, 2021 | 1:07 PM

नवी दिल्ली: सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकारच्यावतीनं अटर्नी जनरल वेणूगोपाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला. केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेल, असं त्यांनी कोर्टात सांगितले. काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सीबीएसईनं बारावीच्या परीक्षेसंदर्भात तीन प्रस्ताव केंद्र सरकारपुढे ठेवले आहेत, अशी माहिती आहे. त्यामध्ये मुख्य विषयाची परीक्षा, बहुपर्यायी प्रश्न स्वरुपात प्रश्न, परीक्षेचं वेळापत्रक याचा त्यामध्ये समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याची माहिती आहे. पीएमओची मंजुरी मिळाल्यानंतर परीक्षेबाबत अंतिम निर्णय घोषित होऊ शकतो. (CBSE Class 12th exam Central Education Minister Ramesh Pokhariyal may announce decision on class 12 exam )

सीबीएसई जुलै महिन्यात परीक्षा घेणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीएसई 24 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान परीक्षांचं आयोजन करु शकते.

मुख्य विषयांचीच परीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते. यामुळे बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यास देखील मदत होऊ शकणार आहे. सीबीएसई कडून बारावीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण 176 विषय निश्चित केलेले असतात. या विषयांपैकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी विषय निवडायचे असतात. त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप एल असे दोन भाग केलेले असतात. ग्रुप ए मधील विषय हे महत्त्वाचे मानले जातात. त्या आधारेच विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ग्रुप ए मध्ये 20 विषय असतात. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांची तीन मुख्य विषयांची परीक्षा घेतली जाईल. याआधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

बहुपर्यायी प्रश्न

सीबीएसई बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी मुख्य विषयांची परीक्षा बहूपर्यायी स्वरुपात घेऊ शकते. यामध्ये सीबीएसई परीक्षेचा कालावधी 30 मिनिटांवर आणू शकते. अनेक राज्यांनी मात्र या पॅटर्नला मंजुरी दिली नसल्याची माहिती आहे.

नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांवर निकाल

सीबीएसई बोर्डाकडून बारावी परीक्षेसंबंधी नव्या पर्यायावर विचार करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेसंबंधी तोडगा निघाला नाही आणि परीक्षा रद्द कराव्या लागल्यास निकाल कसा जाहीर करायचा, याविषयी चर्चा करण्यात येत आहे. सीबीएसई बोर्ड नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करु शकते. मात्र, सीबीएसई बोर्ड परीक्षा घेण्याच्या बाजूनं असल्याची माहिती आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं होतं. राज्यांनी नोंदवलेली मतं आणि देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन रमेश पोखरियाल निशंक हे आज बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा रद्द मात्र पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार? MSEC चा नेमका निर्णय काय?

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, केंद्र सरकार मोठा निर्णय जाहीर करणार?

(CBSE Class 12th exam Central Education Minister Ramesh Pokhariyal may announce decision on class 12 exam )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें