दहावीची परीक्षा रद्द मात्र पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार? MSEC चा नेमका निर्णय काय?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आठवी आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेणार असल्याचं म्हटलं आहे. (Maharashtra Scholarship exam )

दहावीची परीक्षा रद्द मात्र पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार? MSEC चा नेमका निर्णय काय?
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:59 AM

Maharashtra Scholarship Exam पुणे: महाराष्ट्र सरकारनं कोरोना स्थितीमुळं दहावीची परीक्षा रद्द केली आहे. मात्र, पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याची माहिती आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. (Maharashtra Scholarship Exam of class 5 and 8 will conduct after corona outbreak said by Maharashtra state exam council)

कोरोना कमी झाल्यानंतर परीक्षा

फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा 25 एप्रिलला घोषित करण्यात आली मात्र ती 23 मे रोजी आयोजित करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती पाहता परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा घेणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.

परीक्षा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.

6 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार

राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, तारीखही ठरली

Maharashtra Scholarship Exam Postponed:पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा

(Maharashtra Scholarship Exam of class 5 and 8 will conduct after corona outbreak said by Maharashtra state exam council)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.