AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Scholarship Exam Postponed:पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे. MSEC Scholarship Exam Postpone

Maharashtra Scholarship Exam Postponed:पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
| Updated on: May 10, 2021 | 5:01 PM
Share

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि आठवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली आहे. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. (Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad announced State Examination Council postpone 5th and 8th standard scholarship exam know details)

परीक्षा दोन वेळा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.

6 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार

राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा   10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, तारीखही ठरली

राज्यात जिल्हा पातळीवर पुन्हा लॉकडाऊन!, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

(Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad announced State Examination Council postpone 5th and 8th standard scholarship exam know details)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.