AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, केंद्र सरकार मोठा निर्णय जाहीर करणार?

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री मोठा निर्णय जाहीर करु शकतात.

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, केंद्र सरकार मोठा निर्णय जाहीर करणार?
सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jun 01, 2021 | 10:32 AM
Share

नवी दिल्ली: सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकारच्यावतीनं अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला. केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेल, असं त्यांनी कोर्टात सांगितले. दुसरीकडे 14 एप्रिलला दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीच्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत 1 जूनला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करु, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं होतं. त्यामुळे केंद्र सरकार बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. (CBSE Class 12th exam Central Education Minister Ramesh Pokhariyal may announce decision on class 12 exam )

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं होतं. राज्यांनी नोंदवलेली मतं आणि देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन रमेश पोखरियाल निशंक हे आज बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.

सुनावणी पुढे का ढकलली?

सुप्रीम कोर्टात अ‌ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल असं सांगितल.यावर सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षीचं धोरण का बदलण्यात आलं याविषयी समपर्क कारणं द्यावीत, असं देखील सांगितलं. केंद्र सरकार दोन दिवसांत परीक्षांबाबत निर्णय घेईल, त्यासाठी सुप्रीम कोर्टानं आम्हाला गुरुवारपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती के के वेणूगोपाल यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानं ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली.

300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.

सीबीएसई जुलै महिन्यात परीक्षा घेणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीएसई 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान परीक्षांचं आयोजन करु शकते. नियमित पॅटर्न प्रमाणं परीक्षा न घेता मुख्य विषयांच्या परीक्षा घेण्याचा पर्याय देखील सीबीएसई समोर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या:

CBSE, ICSE Class 12 Exams: बारावीच्या परीक्षा रद्द होणार का? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

(CBSE Class 12th exam Central Education Minister Ramesh Pokhariyal may announce decision on class 12 exam )

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर