AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE, ICSE Class 12 Exams: बारावीच्या परीक्षा रद्द होणार का? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.

CBSE, ICSE Class 12 Exams: बारावीच्या परीक्षा रद्द होणार का? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Supreme Court
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 31, 2021 | 10:22 AM
Share

नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या आणि आयसीएसई बोर्डाच्या (ICSE) परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अ‌ॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर ही सुनावणी होईल. (CBSE board exam 2021 Supreme Court of India hear petition demanding cancelling board exam)

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

ममता शर्मा यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी 28 मे म्हणजेच शुक्रवारी स्थगित करण्यात आली होती. आज होणाऱ्या सुनावणीत काय होणार हे पाहावं लागणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 1 जूनला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर केलं होतं. न्यायालय या बाबीकडे लक्ष देणार का पाहावं लागेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बारावीच्या परीक्षेसंदर्भात 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. त्यानंतर रमेश पोखरियाल यांनी 25 मे पर्यंत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांकडून अहवाल मागवले होते. सुप्रीम कोर्टातील आज होणाऱ्या सुनावणीत काय होते हे पाहावं लागणार आहे

300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

CBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न

CBSE board exam: सुप्रीम कोर्टातील बोर्ड परीक्षांवरील सुनावणी स्थगित, याचिकेवर पुन्हा सुनावणी कधी?

(CBSE ICSE board exam 2021 Supreme Court of India hear petition demanding cancelling board exam)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली