AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगावर विरोधकांचे आरोप; ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी, NDAतील मंत्र्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

Chirag Paswan Election Commission Clarification : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आता मुख्य निवडणूर आयुक्त यांच्यासंदर्भातील वादामध्ये आता उडी घेतली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

निवडणूक आयोगावर विरोधकांचे आरोप; ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी, NDAतील मंत्र्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
Chirag Paswan Election Commission ClarificationImage Credit source: social media
| Updated on: Sep 25, 2026 | 3:40 PM
Share

सध्या देशामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण चांगलच तापलं आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण त्यामध्ये भाजपाचा हस्तक्षेप असतो, असा गंभीर आरोप लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही केला आहे. पण काल त्यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा थेट राजीमानाच मागितला आहे. त्याशिवाय कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनीही मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.  त्यातच आता एनडीएकडून केंद्रात मंत्री असलेले लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी राजकीय वातावरण तापत असल्याने निवडणूक आयोगाने यासगळ्यावर स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले चिराग पासवान?

पटना येथे पत्रकारांशी संवाद साधताना चिराग यांनी सांगितलं की, “निवडणूक प्रक्रियेसंबंधी काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणे नेमकं काय आहे ते स्पष्ट करावे, खासकरुन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी यावर त्यांचं मत भक्कमपणे सर्वांसमोर मांडलं पाहिजे. त्यामुळे जनतेच्या मनातही काहीही संभ्रम तयार होणार नाहीत. ”

चिराग यांनी सांगितलं निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र स्वायत्त संस्था असताना त्यावर जर काही आक्षेप घेतले जात असतील तर त्यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीही निवडणूक आयोगाचीच आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “विरोधी पक्षाला काय वाटतं यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे ते सामान्य जनतेला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या सगळ्या गदारोळामुळे जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारचा संभ्रम आणि अविश्वास निर्माण नको व्हायला.”

याचसोबत त्यांनी स्पष्ट केलं की, विरोधी पक्षाकडे राजकारणासाठी मुद्दा काय आहे? त्यामुळे ते असे आरोप करतातच. पण निवडणूक आयोगाने विरोधपक्षाला उत्तर देण्यासाठी नव्हे तर सामान्य जनतेला उत्तर देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशाच्या लोकशाहीची सुंदरता टिकून राहण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास कायम राहणं हे अत्यंत गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना