सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 18 ते 34 वयोगटातील आहे. रस्ते अपघात कमी करणे हे एकमेव असे क्षेत्र आहे, जिथे मला गेल्या 8 वर्षात यश मिळालेले नाही, असे गडकरी पुढे म्हणाले.

सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर केंद्राने घेतला 'हा' मोठा निर्णय
सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 12:21 AM

नवी दिल्ली : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधननंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यास येईल. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सीट बेल्टबाबत घोषणा केली आहे.

एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी केली घोषणा

आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली. भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 18 ते 34 वयोगटातील आहे. रस्ते अपघात कमी करणे हे एकमेव असे क्षेत्र आहे, जिथे मला गेल्या 8 वर्षात यश मिळालेले नाही, असे गडकरी पुढे म्हणाले.

सीटबेल्ट न लावल्यास दंड आकारणार : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सायरस मिस्त्री अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटवर जसा सीट बेल्ट आहे तसाच मागील सीटवरही अलार्म असेल. कारमधील मागील सीटवर सीटबेल्ट न लावल्यास दंड आकारला जाईल.

हे सुद्धा वाचा

सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये अपघाती मृत्यू

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यानंतर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांच्या हिशोबाने डिझाईन असावे, यावरही त्यांनी भर दिला आहे. (Union Road, Transport and Highways Minister Nitin Gadkari big decision regarding seatbelt)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.