“तुम्ही डॉक्युमेंट्री दाखवली, आम्ही काश्मीर फाईल्स दाखवू”; या विद्यापीठात स्क्रीनिंगरवरून राजकारण तापले

| Updated on: Jan 26, 2023 | 11:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवण्यात आलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला अपप्रचार आणि खोटे ठरवून देशात यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद उफाळून आल्याचे सांगितले जात आहे.

तुम्ही डॉक्युमेंट्री दाखवली, आम्ही काश्मीर फाईल्स दाखवू; या विद्यापीठात स्क्रीनिंगरवरून राजकारण तापले
Follow us on

हैदराबादः स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या चळवळीतील विद्यार्थ्यांच्या संघटनेने गुरुवारी हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माहितीपटाचे स्क्रीनिंग ठेवले होते. तर त्याला प्रत्युत्तर देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आता ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट विद्यापीठ परिसरात दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवण्यात आलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला अपप्रचार आणि खोटे ठरवून देशात यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद उफाळून आल्याचे सांगितले जात आहे.

हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा माहितीपट त्याच्यावर बंदी घालण्यापूर्वी दाखवण्यात आला होता. त्यावरून गदारोळही झाला असता.

मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने कोणतीही चुकीचे व बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचे सांगण्यात आले. या माहितीपटावर बंदी घालण्यापूर्वीच त्याचे स्क्रीनिंग करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची चौकशीही करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीने केलेल्या मालिका तसेच द काश्मीर फाइल्सच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्याचे ठरवले होत.

मात्र समोर आल्यानंतर प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला,

जेएनयू विद्यार्थी संघटनेने बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केल्यानंतर दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्येही जोरदार वाद उफाळून आला होता.

जामिया मिलिया इस्लामिया येथे डॉक्युमेंटरी दाखवण्याचे आयोजन केल्यानंतर गदारोळ माजला होता. त्यामुळे स्क्रीनिंग रद्द करावे लागले होते.

काही दिवसांपूर्वी, हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यांच्या कॅम्पसमध्ये पूर्वसूचना किंवा परवानगीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त माहितीपटाचे आयोजन केले होते. त्यानंतर त्याची चौकशी विद्यापीठ प्रशासनाकडून लावण्यात आले होती.