AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा ते पोटनिवडणुका, मोदी है तो मुमकीन हैं : योगी आदित्यनाथ

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

बिहार विधानसभा ते पोटनिवडणुका, मोदी है तो मुमकीन हैं : योगी आदित्यनाथ
| Updated on: Nov 10, 2020 | 5:46 PM
Share

लखनऊ : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्यप्रदेशच्या पोटनिवडणुकांमध्येही उत्तुंग यश मिळवलं आहे. या यशाचं श्रेय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा तसंच गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. (UP Cm Yogi Adityanath on Bihar Election Result)

‘बिहार विधानसभा ते पोटनिवडणुका, मोदी है तो मुमकीन हैं’, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी बिहार विधानसभा निकाल आणि विविध राज्यांत पार पडलेल्या पोटनिवडणुकांच्या निकालाचं वर्णन केलं. “देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या उत्तुंग कामावर विश्वास आहे. त्यांचं काम जनतेच्या मनात आहे. त्याचमुळे या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपाल पसंती दिली”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“ऐन कोरोनाच्या काळात बिहारची निवडणूक पार पडली. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण झोकून देऊन तिथे काम केलं. भाजप नेते. पदाधिकाऱ्यांनी देखील प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवली. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला सध्याचं चांगलं चित्र नजरेस पडलं”, असं योगी म्हणाले.

योगींच्या सभांचा भाजपला फायदा

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले योगी आदित्यनाथ यांनी ज्या-ज्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या त्या जागांवर भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये आठवड्याभरात एकूण 18 रॅली काढल्या. म्हणजे योगी यांनी दिवसाला 3 प्रचार रॅली केल्या. महत्वाची बाब म्हणजे 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर मोठा फटका बसला होता. अशा जागांवर योगी आदित्यनाथ यांनी NDAचा प्रचार केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांनी 6 जागांवर प्रचार केला. त्यात जमुई, काराकाट, पालीजंग, तरारी, अरवल या जागांचा समावेश होता. या सर्व जागांवर 2015मध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. यासह पूर्णिया, सहरसा, सिवान, गोरेयाकोठी, भागलपूर, गोविंदगंज, झंझारपूर आणि दरभंगा या जागांवरही योगींनी प्रचार केला. या ठिकाणी योगींचा प्रचार कामी येताना दिसत आहे.

(UP Cm Yogi Adityanath on Bihar Election Result)

संबंधित बातम्या

Bihar election result 2020: बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा भाजपला मोठा फायदा, प्रचार केलेल्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर

फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Bihar Election Result : ज्ञानू, टीव्ही बंद कर, कोणाला सांगू नकोस, आम्ही इथे आहोत; नितीशकुमारांचा ‘तो’ किस्सा पुन्हा एकदा चर्चेत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.