पूजेसाठी हात जोडले, करंट लागताच चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू, 40 जखमी, कुठे घडलं?

श्रावणातील आज पहिला सोमवार असून एक अत्यंत मोठी दुर्घटना घडलीये, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विजेची तार तुटल्याने मंदिरात मोठा गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पूजेसाठी हात जोडले, करंट लागताच चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू, 40 जखमी, कुठे घडलं?
| Edited By: | Updated on: Jul 28, 2025 | 8:43 AM

एक अत्यंत मोठी दुर्घटना घडलीये. आज पहिला श्रावणी सोमवारी असल्याने काल रात्रीपासूनच भाविकांनी मंदिरांबाहेर मोठी गर्दी केलीये. यादरम्यान एक दुर्घटना घडलीये. मंदिराबाहेर भाविकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला पत्राचा शेड आणि विद्युत प्रवाहाचा संपर्कात आल्याने मोठी दुर्घटना घडली. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील अवसनेश्वर मंदिराबाहेर ही घटना घडलीये. करंट लागल्याने यावेळी दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने 40 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. 

करंट लागल्याने दोन जणांचा मृत्यू मोठी खळबळ 

मृतांपैकी एकाची ओळख पटली असून तो मुबारकपूर येथील रहिवासी आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी चेंगराचेंगरी देखील झाली, यावेळी काही लोक जखमी झाल्याचीही माहिती मिळतंय. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी मध्यरात्री तीनच्या दरम्यान घडलीये. 

विजेची तार तुटल्याने मंदीर परिसरात चेंगराचेंगरी 

एका माकडाने विजेच्या तारेवर उडी मारल्याने तार तुटली, असल्याचे सांगितले गेले. यानंतर भाविकांनी एकच गोंधळ सुरू केला. घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दोन जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी 

रिपोर्टनुसार, प्रशासनाकडून सांगण्यात आले की, काही माकडांनी विजेच्या तारेवर उडी मारली. ज्यामुळे तार तुटली आणि मंदिराच्या परिसरातील शेडवर पडली आणि करंट लागला. यानंतर भाविकांनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेमध्ये दोन जणांचा जीव गेला असून 40 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची अधिकची माहिती ही प्रशासनाकडून घेतली जात आहे. या घटनेची अजूनही चाैकशी सुरू असून मंदिर प्रशासनाने यावर भाष्य करणे टाळले आहे. श्रावणी सोमवार असल्याचे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक विजेची तार तुटल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.