UPSC Exam : यूपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षार्थींना निर्बंधांमधून सूट मिळणार?

| Updated on: Jan 05, 2022 | 6:00 PM

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशावेळी नवे कोरोना निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात होती. मात्र, यूपीएससची मुख्य परीक्षा जाहीर वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगानं बुधवारी जाहीर केलं आहे.

UPSC Exam : यूपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षार्थींना निर्बंधांमधून सूट मिळणार?
यूपीएससी परीक्षेबद्दल सर्वकाही
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : देशात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशावेळी नवे कोरोना निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात होती. मात्र, यूपीएससची मुख्य परीक्षा जाहीर वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगानं बुधवारी जाहीर केलं आहे.

यूपीएससीची मुख्य परीक्षा शुक्रवार, 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. देशभरातून या परीक्षेला 9 हजार 200 परीक्षार्थी पात्र ठरले आहेत. अशावेळी ही परीक्षा जाहीर वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगाने जाहीर केलं आहे. दरम्यान, यूपीएससीच्या परीक्षार्थींना कोरोना निर्बंधांमधून शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मायक्रो कन्टेन्मेंट झोनमधून विद्यार्थ्यांना सूट दिली जावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाल्यास एक दिवस आधीच वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन द्या, अशी मागणीही आयोगाकडून करण्यात आली आहे.

यूपीएससीचं वेळापत्रक

यूपीएससीची मुख्य परीक्षा 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारीला होणार आहे. या तारखांना यूपीएससीचे नऊ पेपर घेण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन पेपर हे क्वॉलिफाईंग स्वरुपाचे असणार आहेत. तर इतर 7 पेपरचे गुण अंतिम यादीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या परीक्षेमधून जे परीक्षार्थी उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

इतर बातम्या :

‘पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं’, काँग्रेसचा पलटवार, सुरजेवालांनी व्हिडीओही दाखवला!

‘विकासविरोधी असल्याचं काँग्रेसनं दाखवून दिलं’, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर भाजपाध्यक्षांचा घणाघात