अमेरिकेनं आपल्या भात्यातील शेवटचं अस्त्र काढलं, इराणकडे आता फक्त 8 च दिवस, अमेरिकेची सर्वात मोठी घोषणा
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. हे युद्ध कधी थांबणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे, परंतु त्यानतंर आता अमेरिकेनं तडकाफडकी मोठा निर्णय घेतला असून, यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

गेल्या 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे इराणकडून देखील ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, अशा देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. या युद्धात अमेरिकेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. नेपाळचा जेवढा जीडीपी आहे. त्यापेक्षा अधिक खर्च अमेरिकेचा या युद्धावर झाला आहे. तर दुसरीकडे इराणकडून या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये नाकेबंदी करण्यात आल्याने संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडले आहेत.
त्यामुळे आता हे युद्ध कधी थांबणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असतानाच अमेरिकेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे इराणचं टेन्शन वाढलं आहे. इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडे सहा अटी पाठवल्या होत्या, परंतु इराणच्या अटींची यादी वाचून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा आता चांगलाच वाढला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी तडकाफडकी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या आठवड्यापासून इराणमधून आम्ही एकही विमान उडू देणार नाही, इराणची संपूर्ण विमान सेवा ठप्प होईल, तसेच ज्या विमान कंपन्या इराणला सेवा पुरवतील त्यांच्यावर आम्ही डबल टॅरिफ लावू अशी धमकी देखील स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे. त्यामुळे आता इराणची विमान सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
पुढच्या आठवड्यापासून इराणची विमान सेवा ठप्प होईल, कोणत्याही विमान कंपन्यांनी इराणच्या विमानांना इंधन पुरवठा करू नये, तसेच कोणतीही तांत्रिक मदत करू नये, कोणत्याही कंपनीने इराणच्या एअरलाईन्सचे तिकीट विकू नये, जर त्यांच्या तिकिटांची विक्रीच होणार नाही, तर मग त्यांचे विमान कसे उड्डाण करणार? ज्या कंपन्या इराणच्या विमान कंपन्यांना सेवा पुरवतील अशा कंपन्यांवर आम्ही डबल टॅरिफ लावू असं यावेळी बेसेंट यांनी म्हटलं आहे.